विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : संपूर्ण जगातल्या कम्युनिस्ट राजवटी पण पत्याच्या बंगल्यासारख्या कोसळल्या असल्या तरी चीनमध्ये कम्युनिस्टनची सत्तेवरची पकड शी जिनपिंग यांच्या रूपाने अधिकच घट्ट झाली आहे. शी जिनपिंग यांच्या नेतृत्वाखाली चिनी ड्रॅगन आफ्रिका आणि आशिया खंडातले वेगवेगळे देश चिनी कर्जाच्या ओझ्याखाली दाबत आहे. पण अशा स्थितीतही भारतातल्या मार्क्सवादी कम्युनिस्टांचे चीन प्रेम कमी झालेले नाही. शी जिनपिंग यांची चीनच्या अध्यक्षपदावर सलग तिसऱ्यांदा निवड झाल्यानंतर बाकी कोणा मुख्यमंत्र्यांनी नाही, पण केरळचे मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी मात्र शी जिनपिंग यांना अभिनंदनाचा लाल सलाम पाठवला आहे.Kerala CM Pinarayi Vijayan extends wishes to Xi Jinping for re-election as Chinese President
चीन आणि सोवियत रशिया प्रेम
भारतातल्या दोन कम्युनिस्ट पार्ट्यांचे सोवियत रशिया आणि चीन प्रेम नेहमीच ओसंडून वाहते. मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी चिनी माओवादाला आपले तत्वज्ञान मानते, तर भारतीय कम्युनिस्ट पार्टी पूर्वाश्रमीच्या सोवियत रशियाला आपले गुरु मानते. भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे नेते कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांना सोवियत रशियाने ऑर्डर ऑफ लेनिन हा त्यांचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान केला होता.
कम्युनिस्टांचे लाल सलाम प्रेम
त्यामुळे भारतीय कम्युनिस्ट पार्टी असो अथवा मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी दोघांचेही लाल सलाम प्रेम भारतीय राष्ट्रवादापेक्षा जास्त मोठे आहे. आता सोवियत रशिया उरला नाही. रशिया मधून कम्युनिझम खतम झाला. पण तिथे व्लादिमिर पुतिन यांची हुकूमशाही कायम आहे, तसेच चीनमध्ये माओवादी कम्युनिस्टनची सत्ता नुसतीच कायम नाही, तर शी जिनपिंग यांच्या हुकूमशाहीच्या रूपाने अधिकच घट्ट झाली आहे. याचा भारतातल्या मार्क्सवादी कम्युनिस्टांना प्रचंड आनंद झाला आहे आणि त्यातूनच केरळचे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे मुख्यमंत्री यांनी अभिनंदनचा लाल सलाम पाठविला आहे.
चीनचे भारताशी शत्रुत्व तरीही…
चीन भारताशी शत्रुत्व राखतो आहे. लडाख, अरुणाचलसह सर्व सीमांवर सैन्य तैनाती वाढवतो आहे. भारताची सीमा सतत पेटती ठेवण्याचा चीनचा इरादा आहे, तरी देखील मार्क्सवादी कम्युनिस्टांचे चीन प्रेम कमी झालेले नाही. उलट पिनराई विजयन यांनी शी जिनपिंग यांना पाठविलेल्या अभिनंदनाच्या लाल सलाम संदेशात चीन हा जागतिक राजकारणात मोठा आवाज बनू पाहत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. चीन जास्तीत जास्त समृद्ध व्हावा, अशी कामना केली आहे.
Revolutionary greetings to President Xi Jinping on his re-election as the President of the People's Republic of China. It is truly commendable that China has emerged as a prominent voice in global politics. Best wishes for the continued efforts to achieve a more prosperous China. — Pinarayi Vijayan (@pinarayivijayan) March 12, 2023
Revolutionary greetings to President Xi Jinping on his re-election as the President of the People's Republic of China. It is truly commendable that China has emerged as a prominent voice in global politics. Best wishes for the continued efforts to achieve a more prosperous China.
— Pinarayi Vijayan (@pinarayivijayan) March 12, 2023
मार्क्सवादी कम्युनिस्टंचा वेगळा इरादा
वास्तविक कोणत्याही देशात राष्ट्राध्यक्ष अथवा पंतप्रधान निवडून आल्यानंतर प्रोटोकॉल नुसार भारताचे राष्ट्रपती आणि पंतप्रधान हे अभिनंदनपर संदेश पाठवत असतात. सर्वसाधारणपणे कोणत्याही राज्याचे राज्यपाल अथवा मुख्यमंत्र्यांनी कोणत्याही देशाच्या पंतप्रधान अथवा राष्ट्राध्यक्षांना अभिनंदनपर संदेश पाठवण्याचा भारतात प्रघात नाही. तरी देखील चीनमध्ये शी जिनपिंग यांच्या अध्यक्षपदाच्या रूपाने कम्युनिस्ट राजवट अधिक घट्ट झाली, याबद्दल केरळचे मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी शी जिनपिंग यांना अभिनंदनाचा लाल सलाम पाठवून आपला वेगळा इरादा दाखवून दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App