केंद्र सरकारची महत्त्वाची घोषणा : निवृत्त अग्निवीर जवानांना बीएसएफमध्ये 10% आरक्षण, शारीरिक कार्यक्षमता चाचणीतही सूट

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : केंद्र सरकारने निवृत्त अग्निवीरांसाठी बीएसएफमध्ये 10% आरक्षण जाहीर केले आहे. यासोबतच उच्च वयोमर्यादेतही सूट देण्यात आली आहे. अग्निवीर पहिल्या बॅचचा किंवा त्यानंतरच्या बॅचचा भाग आहे यावर ही सूट अवलंबून असेल. एवढेच नाही, तर या लोकांना शारीरिक चाचणीही द्यावी लागणार नाही. बीएसएफ जनरल ड्युटी कॅडर भर्ती नियम 2015 मध्ये सुधारणा केल्यानंतर ही घोषणा करण्यात आली आहे.Central Government’s Important Announcement 10% reservation in BSF for retired firemen, relaxation in physical efficiency test too

राजपत्र अधिसूचना जारी

केंद्राने 6 मार्च रोजी ही अधिसूचना जारी केली होती. यानुसार कॉन्स्टेबल पदासाठी अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीच्या उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत 5 वर्षांची सूट मिळणार आहे. त्यानंतरच्या सर्व बॅचच्या उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत 3 वर्षांची सूट दिली जाईल.



रॅलीतील गर्दी कमी करण्यासाठी लष्कराने घेतला हा निर्णय

यापूर्वी भारतीय लष्कराने अग्निवीरच्या भरती प्रक्रियेत बदल केला होता. उमेदवारांना प्रथम लेखी परीक्षेला बसावे लागेल. परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरच उमेदवार रॅलीत सामील होतील. भरतीचा शेवटचा टप्पा वैद्यकीय चाचणी असेल. या भरती मेळाव्यातील गर्दी कमी करण्यासाठी लष्कराने हा निर्णय घेतला आहे.

आतापर्यंत भरती प्रक्रियेत प्रथम मेळाव्याचे आयोजन केले जात होते. त्यानंतर रॅलीतून निवड झालेल्या उमेदवारांची वैद्यकीय चाचणी घेण्यात यायची. नंतर परीक्षा व्हायची. त्याचबरोबर या बदलानंतर उमेदवारांना दुसऱ्या परीक्षेच्या तयारीसाठीही वेळ मिळणार आहे.

Central Government’s Important Announcement 10% reservation in BSF for retired firemen, relaxation in physical efficiency test too

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात