प्रतिनिधी
मुंबई : छत्रपती संभाजीनगरमध्ये काही लोक नामांतराच्या मुद्द्यावरून औरंगजेबाचे उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी बुधवारी विशेष बाबअंतर्गत मुद्दा उपस्थित करत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. त्यावेळी, औरंगजेबाचे उदात्तीकरण करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याची ग्वाही शिंदे फडणवीस सरकारने दिली. Aurangajeb supporters will be punished according to law of the land
एएमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनकर्त्यांनी कोणतीही वेळ न पाळता रात्री १२ वाजेपर्यंत घोषणाबाजी करून वेळेच्या नियमांचं उल्लंघन केले, याकडेही दानवे यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. यावर सरकारने उत्तर देताना या आक्षेपार्ह बाबीची शासनाकडून गंभीर दखल घेतली जाईल. आजच गृहमंत्री यांच्याशी चर्चा करून त्यावर कारवाई केली जाईल, असे आश्वासन देण्यात आले.
त्याचप्रमाणे औरंगजेबाच समर्थन आणि उदात्तीकरण करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्याची नेमणूक करून याबाबत तपासणी करण्यात यावी, असे निर्देश उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App