प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : औरंगाबादचे नामांतर ठाकरे – पवार सरकारने त्यानंतर शिंदे – फडणवीस सरकारने छत्रपती संभाजीनगर असे केले. त्यावर केंद्र सरकारने शिक्कामोर्तब देखील केले. मात्र या नामांतराला असदुद्दीन ओवैसी यांच्या एआयएमआयएम पक्षाचा ठाम विरोध आहे. त्यामुळे त्या पक्षाने संभाजीनगर मध्ये मोठे आंदोलन केले.AIMIM opposed aurangabad renaming, but NCP faces splits in city unit
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील नामांतरामुळे प्रचंड अस्वस्थता असून राष्ट्रवादीतले अल्पसंख्यांक नेते आणि कार्यकर्ते आता पक्षातून बाहेर पडण्याचा मनसूबा बोलून दाखवत आहेत. छत्रपती संभाजीनगर मधील 10 मोठे पदाधिकारी आणि त्यांच्याबरोबरचे अनेक कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसचा सामूहिक राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याच्या बातम्या आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये संभाजीनगरात फूट पडण्याचा धोका निर्माण झाला आहे.
ठाकरे – पवार सरकारच्या अखेरच्या दिवसांमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आग्रहामुळे औरंगाबादचे नामांतर छत्रपती संभाजीनगर करण्यात आले. त्यावर ठाकरे – पवार सरकार घालवून महाराष्ट्रात आलेल्या शिंदे – फडणवीस सरकारने देखील पसंतीची मोहोर उमटवली. केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवून तो मंजूरही करून घेतला. आता अधिकृतरित्या औरंगाबादचे नामांतर छत्रपती संभाजीनगर असे झाले आहे.
मात्र त्या विरोधात असदुद्दीन ओवैसी यांच्या पक्ष एआयएमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी उपोषण केले. त्यांच्या या उपोषण आंदोलनानंतर मोठी बिर्याणी पार्टी झाल्याचेही फोटो व्हायरल झाले. आता औरंगाबादच्या नामांतराच्या विरोधात एआयएमआयएम पक्षामध्ये एक मत आहे. पण राष्ट्रवादीला फुटीचा धोका निर्माण झाला आहे. राष्ट्रवादीतील अल्पसंख्यांक नेते आणि पदाधिकारी कार्यकर्ते पक्षाचा सामूहिक राजीनामा देऊन बाहेर पडण्याच्या तयारीत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आता धर्मनिरपेक्ष पक्ष उरला नाही. औरंगाबादच्या नामांतराला पाठिंबा देऊन त्यांनी ते सिद्ध केले आहे. त्यामुळे आम्हाला त्या पक्षात राहणे शक्य नाही, असे सांगून या कार्यकर्त्यांनी सामूहिक राजीनाम्याची तयारी केली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App