अग्निवीर भरती प्रक्रियेत बदल; मानसिक, शारीरिक क्षमतेवर अधिक भर

 वृत्तसंस्था

नवी दिल्ली: अग्निवीर भरती प्रक्रियेत महत्त्वाचा बदल घडला आहे. सैन्य दलाच्या भरती प्रक्रियेत आधी शारीरिक चाचणी आणि नंतर शेवटी लेखी परीक्षा घेतली जायची. परंतु या वेळेस मानसिक आणि शारीरिक आरोग्याचा समतोल राखण्यासाठी भारतीय लष्कराने भरती प्रक्रियेत बदल केला आहे. लष्कराच्या अधिकाऱ्यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. अग्नी वीर प्रक्रियेत आता शारीरिक आणि मानसिक रित्या सुदृढ असणारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे. असे अधिकारी कर्नल जी सुरेश यांनी सांगितले आहे. Changes in firefighter recruitment process; More emphasis on mental, physical abilities

भरती प्रक्रियेत झालेले बदलातील पहिला बदल, म्हणजे सैन्य दलाच्या आधी शारीरिक चाचणी आणि त्यानंतर लेखी परीक्षा घेतली जायची. ती बदलून आता लेखी परीक्षा ही भरती मधील पहिली पायरी असणार आहे. भरती होणाऱ्या उमेदवार शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या मजबूत आहेत का? हे पाहण्यावर भर दिली जाणार आहे. लेखी परीक्षेनंतर या विद्यार्थ्यांची शारीरिक आणि वैद्यकीय चाचणी घेण्यात येणार आहे.

तर लेखी परीक्षेसाठी उमेदवारांना पाचशे रुपये शुल्क भरावे लागत आहे. या रकमेपैकी 250 रुपये भारतीय सैन्यदल देणार आहे. उमेदवारांना फक्त 250 रुपये भरावे लागतील. असे कर्नल जी सुरेश यांनी स्पष्ट केले आहे.

अग्निवीर म्हणून भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. वर्षातून एकदाच त्याची नोंदणी करता येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी भरती साठी भारतीय लष्कराच्या अधिकृत वेबसाईटवर अर्ज करावा. ऑनलाइन अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 15 मार्च 2023 हि आहे. असे उमेदवारांना अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.

Changes in firefighter recruitment process; More emphasis on mental, physical abilities

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात