विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : एकीकडे राहुल गांधी केंब्रिजमध्ये भाषणे देत भारतात लोकशाही नसल्याचा दावा ठोकत आहेत, तर दुसरीकडे भारताच्या अर्थव्यवस्थेला “हिंदू रेट ऑफ ग्रोथ”चा धोका पुन्हा उद्भवणार असल्याचा इशारा रिझर्व बँकेचे माझी गव्हर्नर रघुराम राजन देत आहेत. राष्ट्रीय ते आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताच्या अपमान आणि बदनामीचा सिलसिला असा सुरू आहे. Raghuram rajan insulted India by saying hindu rate of growth, but forgot the fact that it was during 1950 – 80 in Congress regime
रघुराम राजन यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेविषयी चिंता व्यक्त करताना “हिंदू रेट ऑफ ग्रोथ”चा पुन्हा धोका भारताला उद्भवल्याचा दावा केला आहे. जागतिक पातळीवर मंदी विस्तारत आहे, उत्पादकता कमी झाली आहे, विकसित देशांमध्ये मागणी कमी आहे, या सर्वांचा परिणाम म्हणून भारताच्या आर्थिक विकास दरावर दीर्घकालीन दुष्परिणाम होऊ शकतो. योग्य उपाययोजना केल्या नाहीत, सेवा क्षेत्राला पुन्हा चालना दिली नाही, तर “हिंदू रेट ऑफ ग्रोथ”चा धोका पुन्हा उत्पन्न होऊ शकतो, असा इशारा रघुराम राजन यांनी दिला आहे.
भारत मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली जेव्हा मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात काही प्रगती करू इच्छित आहे, त्यावेळी रघुराम राजन यांनी मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राकडे दुर्लक्ष करून सेवा क्षेत्राकडे पुन्हा वळावे, असा आपला लाडका सिद्धांत वारंवार मांडला आहे. मोदी सरकारच्या अर्थनीतीचे ते टीकाकार मानले जातात. हेच ते रघुराम राजन आहेत, ज्यांची राहुल गांधींनी भारत जोडो यात्रेदरम्यान सविस्तर मुलाखत घेतली होती. मात्र त्यावेळी त्यांनी भारताला “हिंदू रेट ऑफ ग्रोथ”चा धोका असल्याचे भाकीत वर्तविले नव्हते. ते आता वर्तविले आहे.
पण मुळात ज्या “हिंदू रेट ऑफ ग्रोथ”चा उल्लेख रघुराम राजन करतात, ती संकल्पना आली कुठून आणि कशामुळे??, याचा विचार केला तर वेगळ्याच सत्यावर उजेड पडतो!!
– काँग्रेस सरकारच्या काळातला ग्रोथ रेट
1950 ते 1980 या चार दशकांमध्ये भारतात ज्यावेळी काँग्रेसची सरकारे होती, तेव्हा भारताच्या आर्थिक विकासाचा दर सर्वसाधारणपणे 3.5 % असायचा. भारतात गरिबी आणि बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर होती. भारताचे औद्योगिकीकरण पुरेसे झालेले नव्हते. शेती देखील मागास अवस्थेतच होती. उत्पन्नाची पुरेशी साधने नव्हती. भारताने कितीही प्रयत्न केले तरी विकासदर 3.5 % वर कधी गेला नाही. म्हणून 1978 मध्ये जनता राजवटीच्या काळात त्या वेळचे प्रख्यात अर्थशास्त्रज्ञ राजकृष्ण यांनी “हिंदू रेट ऑफ ग्रोथ” असे टिंगल टवाळी करताना म्हटले होते. पाश्चिमात्य अर्थशास्त्रज्ञांनी त्यांचे हेच शब्द संकल्पनेच्या स्वरूपात उचलले आणि भारतावर 1990 च्या दशकापर्यंत सातत्याने “हिंदू रेट ऑफ ग्रोथ” याच शब्दांचे ते लांच्छन लावत राहिले. 1991 नंतर नरसिंह राव सरकारने आर्थिक सुधारणांची दमदार पावले उचलली. तीच वाजपेयी सरकारने पुढे नेली. त्यामुळे भारताचे चित्र बदलले. पण तेव्हा कोणी “हिंदू रेट ऑफ ग्रोथ” वाढल्याचे म्हटले नव्हते. त्याला भारताच्या आर्थिक सुधारणा, उदारीकरण अशीच संकल्पना स्वरूपात नावे दिली होती. ही विशिष्ट भारतीय अर्थशास्त्रज्ञांची राजकीय चतुराई होती!!
पण आज जेव्हा जागतिक अर्थव्यवस्था लडखळत आहे विकसित देशांच्या अर्थव्यवस्थांना वेगवेगळ्या कारणांमुळे घरघर लागली आहे, तेव्हा भारताची अर्थव्यवस्था मेक इन इंडिया किंवा अन्य उपाययोजनांनी स्वतःला सावरू पाहत आहे आणि मजबुतीने उभे आहे, त्यावेळी रघुराम राजन यांच्यासारख्या अर्थशास्त्रज्ञांना भारतावरचा “हिंदू रेट ऑफ ग्रोथ”चा धोका पुन्हा दिसू लागला आहे. पण हा “हिंदू रेट ऑफ ग्रोथ” काँग्रेस सरकारच्या राजवटीच्या काळात होता हे सांगायला मात्र रघुराम राजन सोयीस्कर रित्या विसरले आहेत!!
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App