विशेष प्रतिनिधी
पुणे : कसब्यात धंगेकरांना यश मिळेल, याची शरद पवारांना खात्री नव्हती. हे खुद्द त्यांनीच पुण्यातल्या आजच्या पत्रकार परिषदेत हे सांगितले. नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर यांनी शरद पवारांची आज भेट घेतली. या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना शरद पवारांनी कसब्याच्या पोटनिवडणुकीवरची आपली सविस्तर मते पुन्हा एकदा व्यक्त केली. Kasba Byelection : Sharad Pawar praised girish bapat, ravindra dhangekar but pinched chandrakant patil
रवींद्र धंगेकर यांच्याबरोबर गिरीश बापटांच्या नेतृत्वाची त्यांनी स्तुती केली. ही स्तुती करताना शरद पवार नेहमीप्रमाणे “बिटवीन द लाईन्स” बोलले. गिरीश बापटांचे पुण्याचा भाजप सोडून बाकी सर्वांची चांगले संबंध आहेत. त्यांचे काम चांगले आहे. त्यामुळे आम्हाला धंगेकरांच्या विजयाविषयी खात्री नव्हती, पण मुख्य कारण शनिवार, नारायण, सदाशिव पेठ हे होते, असे शरद पवार म्हणाले.
शरद पवारांनी कोणाचीही स्तुती करणे हे धोकादायक वाटते, असे राज ठाकरे यांनी त्यांच्याच घेतलेल्या मुलाखतीमध्ये त्यांच्यासमोर सांगितले होते. शरद पवारांच्या आतल्या आजच्या पत्रकार परिषदेतले हेच नेमके “बिटवीन द लाईन्स” आहे. त्यांनी एकाच वेळी गिरीश बापट आणि रवींद्र धंगेकर यांची वेगवेगळ्या शब्दांमध्ये स्तुती केली आहे. गिरीश बापटांचे काम उत्तम आहे. सदाशिव, नारायण, शनिवार पेठ भाजपचा मतदार मोठा आहे हे सांगून पवारांनी एकीकडे गिरीश बापटांना चुचकारताना भाजपच्या जखमेवर मीठ चोळले आहे, तर दुसरीकडे गिरीश बापटांची स्तुती करून काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर हे वैयक्तिक कितीही चांगले असले तरी काँग्रेसचे यश निर्भेळ नाही, हेही “बिटवीन द लाईन्स” सांगून टाकले आहे.
याच पत्रकार परिषदेत शरद पवारांनी चंद्रकांतदादा पाटलांनाही वेगळा टोला हाणला आहे. त्यांनी चंद्रकांतदादांचे नाव घेतले नाही, पण चंद्रकांतदादा संदर्भात पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर जरा शहाण्या माणसाविषयी मला प्रश्न विचारा, असे सांगून पवारांनी त्यांना चिमटा काढला आहे. म्हणजेच पवारांनी एकाच वेळी गिरीश बापटांची स्तुती, रवींद्र धंगेकर यांचे यश वैयक्तिक पण काँग्रेसचे यश निर्भेळ नाही आणि त्याचवेळी चंद्रकांतदादा पाटलांना टोला असे तिहेरी वार करून पुण्याच्या राजकारणात आपल्याला जे साध्य करायचे आहे ते करून घेण्याचा प्रयत्न केला आहे!!
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App