
प्रतिनिधी
रत्नागिरी : आपला गट मजबूत करण्यासाठी बरेच दिवसांनी उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडून कोकणाच्या दौऱ्यावर रत्नागिरीत दाखल झाले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड मध्ये त्यांच्या गटाची जाहीर सभा होणार आहे. त्यांची ही सभा यशस्वी करण्यासाठी मुसलमान पुढे सरसावले आहेत. Muslim marathi seva sangh strongly supports Uddhav Thackeray’s ratnagiri – khed rally
मुस्लिम मराठी सेवा संघाने उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेला जाहीर पाठिंबा दिला असून त्यांनी तसे पत्रक काढले आहे. उद्धव ठाकरेंच्या सभेला 25 ते 30 हजार मुस्लिम उपस्थित राहतील. यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, असे मुस्लिम मराठी संघाचे फारुख ठाकूर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
उद्धव ठाकरे यांचे सरकार शिवसेनेतून बंडखोरी करून खाली खेचण्यात आले. ते मुस्लिम समाजाला पसंत नाही. देशात अल्पसंख्याकांविरुद्ध वातावरण तापवण्यात आले आहे. त्यामुळे आम्ही उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहत आहोत, असे वक्तव्य फारूक ठाकूर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले आहे.
आज 5 मार्च 2023 रोजी सायंकाळी उद्धव ठाकरेंची खेडमध्ये जाहीर सभा होत आहे. त्याला मोठ्या प्रमाणावर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातले मुसलमान उपस्थित राहणार आहेत, याची ग्वाही फारूक ठाकूर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दिली आहे.
आम्ही हिंदुत्व सोडलेले नाही भाजपचे हिंदुत्व खोटे आहे निगडी आहे अशी टीका उद्धव ठाकरे सातत्याने करत असतात आता मुस्लिम मराठी सेवा संघाचा प्रचंड पाठिंबा मिळाल्यानंतर उद्धव ठाकरे रत्नागिरी खेडीच्या सभेत कोणत्या हिंदुत्वाविषयी वळणार याविषयी महाराष्ट्रात उत्सुकता आहे.
Muslim marathi seva sangh strongly supports Uddhav Thackeray’s ratnagiri – khed rally
महत्वाच्या बातम्या
- Bamboo Crash Barrier : अद्भुत भारत! जगातील पहिला २०० मीटर लांब ‘बांबू क्रॅश बॅरियर’ बसवण्यात आला महाराष्ट्रातील महामार्गावर
- Attack on Sandeep Deshpande : मनसे नेते संदीप देशपांडे हल्लाप्रकरणी आणखी दोघांना अटक, ओळखही पटली
- भाजपा- शिवसेनेची मुंबईत सहा लोकसभा मतदारसंघांमध्ये आशीर्वाद यात्रा; पण साध्य काय करणार??