
वृत्तसंस्था
मुंबई : बॉलिवूड आणि बॉलिवूड सेलिब्रिटी यांची पर्सनल लाईफ ही नेहमी चर्चेत राहते. कालरात्री देखील अशी एक घटना घडली. काल रात्री 11.30 ते 12.00 च्या दरम्यान बॉलीवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकीची पत्नी आलिया सिद्दिकी उर्फ अंजना किशोर पांडे हिचा एक व्हिडिओ एक तिने सोशल मीडियावर पोस्ट केला. मी माझ्या मुलांसह बाहेर गेले होते. त्यांच्यासोबत परतल्यावर मुंबईच्या घराच्या गेटवर मला अडवण्यात आले. माझ्याकडे फक्त 81 रुपये आहेत. आणि मला कळत नाहीये इतक्या उशिरा मी माझ्या मुलांना घेऊन कुठे जाऊ? माझ्यासोबत आणि मुलांसोबत हे बरोबर वागत नाहीयेस. असं तिच्या व्हिडिओमध्ये ती म्हणत आहे. त्यांची मुलगी शोर इथे व्हिडिओमध्ये हमसून मसूल रडताना दिसली. हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला. या व्हिडिओला नंतर नवाजने उत्तर दिले. आलियाने जो काही व्हिडिओ काढला आहे तो खोटा आहे, असा दावा केला. Wife Anjana Kishore’s video of Nawazuddin Siddique kicking her out of the house with her children; But Nawaz denied the allegations
नवाजुद्दीन आणि त्याच्या पत्नीमध्ये संपत्तीवरून वाद सुरू आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून ते सतत चर्चेत आहेत. नवाजुद्दीन सिद्दिकीवर पत्नीने त्याचे बाहेर अफेअर असल्याचे आरोप केले आहेत. त्याशिवाय मुली संदर्भात अनेक गंभीर आरोप देखील पतीवर केले आहेत. शुक्रवारी नवाजुद्दीन सिद्दिकीच्या पत्नीने दोन व्हिडिओ शेअर करत पतीने आपल्याला रात्री मुलांसह घराबाहेर काढण्याचा आरोप केला होता. या आरोपावर नवाजुद्दीन सिद्दिकीने उत्तरा दाखल हा व्हिडिओ खोटा आहे असे म्हटले आहे. नवाजुद्दीन सिद्दिकी च्या प्रवक्त्यानेही आलियाने केलेल्या आरोपांना फेटाळून लावले आहे. ती हे सगळे साफ खोटे बोलतेय, असे देखील म्हटले आहे.
नवाजुद्दीनने संपत्ती आधीच आपली आई मेहरुनिसा सिद्दिकी यांच्या नावावर केलेली आहे. त्याच्या आईच्या केअरटेकरने मुलांना घरात घेण्याची परवानगी दिली आहे. आलियाला मात्र घरात प्रवेश करण्यास मनाई आहे. नवाजुद्दीने आलियासाठी मुंबईत एक फ्लॅट घेतला होता. जो सध्या तिने भाड्याने दिला आहे, असेही प्रवक्त्याने म्हटले आहे.
Wife Anjana Kishore’s video of Nawazuddin Siddique kicking her out of the house with her children; But Nawaz denied the allegations
महत्वाच्या बातम्या
- UNHRC : काश्मीर, दहशतवाद आणि अल्पसंख्यांकावरील अत्याचारांवरून भारताने पाकिस्तानला फटाकरलं!
- सहा महिन्यांपूर्वी मिळाला शांततेचा नोबेल, आता 10 वर्षांचा तुरुंगवास, बेलारुसमध्ये एलेस यांना कोर्टाने ठरवले दोषी
- राहुल गांधींनी केंब्रिजमध्ये केले चीनचे कौतुक : म्हणाले- चीन हा शांतताप्रिय देश आहे, तिथले सरकार कॉर्पोरेशनसारखे काम करते
- केंब्रिजमध्ये भारताची निंदा करून राहुल गांधींची अफाट चीन स्तुती!!; हेमंत विश्वशर्मांची सणसणीत चपराकी उत्तरे