तुर्कस्तानकडून पाकिस्तानचा अपमान! पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे यजमानपद नाकारले

Shahabaj Sharif

तुर्कस्तानमध्ये भूकंपामुळे हाहाकार माजला आहे. जगभरातील देश मदत साहित्य आणि बचाव दल तुर्कस्तानमधील नागरिकांच्या मदतीसाठी पाठवत आहेत.

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांना भूंकपग्रस्त तुर्कस्तानने आंतरराष्ट्रीय स्तरवर अपमानित केलं आहे. तुर्कस्तानमध्ये आलेल्या भूकंपामुळे हाहाकार माजला आहे. अशावेळी जगभरातील देश मदत साहित्य आणि बचाव दल तुर्कस्तानमधील नागरिकांच्या मदतीसाठी पाठवत आहेत. परंतु पाकिस्तानने संधी म्हणून या संकटाच्या क्षणाचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला जो त्यांच्यावरच उलटला.Turkastan insults Pakistan, refuses to host PM Shehbaz Sharif

वास्तविक पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी तुर्कस्तानबरोबर एकजुट दाखवण्यासाठी अंकारा येथे जाण्याची घोषणा केली होती. मात्र त्यांनी हा विचार केला नाही की, सध्या नैसर्गिक आपत्तीचा सामना करणाऱ्या देशाच्या संसाधनांचा वापर व्हिआयपी व्यक्तींच्या दौऱ्यावर खर्च होऊ नयेत.

पंतप्रधान शहबाज शरीफ उद्या सकाळी अंकारासाठी रवाना होतील. ते भूकंपामुळे झालेली जीवीतहानी व नुकसान याबद्दल तुर्कस्तानचे राष्ट्राध्यक्ष एर्दोआन यांच्याकडे संवेदना व्यक्त करतील. पंतप्रधानांच्या तुर्की दौऱ्यामुळे गुरुवार ९ फेब्रवारी रोजी आय़ोजित करण्यात आलेली एपीसी रद्द करण्यात येत आहे. अशी माहिती पाकिस्तानच्या माहिती मंत्रालयाच्या मंत्री मरियम औरंगजेब यांनी ट्वीटद्वारे दिली होती.

तथापि, मरियम यांच्या ट्वीटच्या काही तासांनंतरच तुर्कीच्या पंतप्रधानांचे माजी विशेष सहाय्यक आझम जमील यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांचे यजमानपद स्वीकारण्यास आपल्या देशाची अनिच्छा सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहीर केली.

‘’अशावेळी तुर्कस्तानचे अंतिम उद्दिष्ट हे येथील पाहुण्यांची देखभाल करणे आहे. कृपया बचाव व मदत पथकनाच पाठवावे.’’ असं त्यांनी ट्वीटद्वारे म्हटलं आहे.

यानंतर पाकिस्तानाला उपरती झाली आणि मग पाकिस्तानच्या मंत्री मरियम औरंगजेब यांनी सांगितले की, पंतप्रधान शहबाज शरीफ यांचा तुर्कस्तान दौरा पुढे ढकलण्यात आला आहे. तुर्कस्तान आणि सीरियामध्ये झालेल्या भीषण भूकंपानंतर सुरू असलेले मदत कार्य पाहता पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी दौरा रद्द केला आहे. याशिवाय असेही सांगण्यात आले की, पंतप्रधान शहबाज शरीफी यांनी आपले बंधू राष्ट्र तुर्कस्तानमधील भूकंप पीडितांच्या मदतीसाठी पंतप्रधान मदत निधीचा स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे. मंत्रीमंडळाने मदत निधीसाठी एक महिन्याचे वेतन देण्याची घोषणा केली आहे. तसेच, पंतप्रधानांन आवाहन केले आहे की आपल्या बंधू राष्ट्रासाठी उदारपणे मदत करावी. असेही सांगण्यात आले होते.

शहबाज शरीफ तुर्कस्तानला रवाना होणार होते. त्यांनी ५१ सदस्यीय बचाव दलही पाठवले आणि मदत निधीही स्थापन केला. मात्र पाकिस्तान स्वत: एवढा गरीब आहे की, अशावेळी तो तुर्कस्तानला किती मदत करू शकेल, हा खरंतर प्रश्नच आहे.

Turkastan insults Pakistan, refuses to host PM Shehbaz Sharif

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात