महत्त्वाची बातमी : सर्वसामान्यांच्या दैनंदिन आयुष्यावर होणार परिणाम; १ मार्चपासून होत असलेले बदल माहीत आहेत का?

Comman Man new
  • जाणून घ्या, सर्वसामान्यांशी निगडीत असणाऱ्या पाच प्रमुख बाबींमध्ये काय बदल होणार आहे?

विशेष प्रतिनिधी 

 आजपासून मार्च महिना सुरु झाला आहे, म्हणजेच नवीन आर्थिक वर्षही सुरू झालं आहे. हा महिना सुरू होण्याच्या पहिल्या तारखेपासूनच सर्वसामान्यांशी निगडीत असणाऱ्या बाबींमध्ये आणि दैनंदिन घडामोडींशी संबंधित काही नियमांमध्ये बदल झाले आहेत. यामध्ये प्रामुख्याने एलपीजी सिलिंडरचे दर, बँक कर्ज, रेल्वे वेळापत्रक, सोशल मीडियासंबंधी नवीन नियम, बँकेच्या सुट्ट्या आदींचा समावेश आहे. जाणून घेऊयात नेमके काय बदल आजपासून झाले आहे. From March 1, the daily life of common people will be affected

  • एलीपीजी सिलिंडरच्या दरात वाढ –

घरगुती वापराच्या एलीपीजी सिलिंडरच्या दरात आजपासून ५० रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे आजपासून दिल्लीत हे सिलिंडर आता ११३० रुपयांना उपलब्ध होणार आहे. याशिवाय व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किंमतीतही वाढ झाली असून हे सिलिंडर ३५०.५० रुपयांनी महागले आहे. परिणामी हे सिलिंडर दिल्लीत २११९.५० रुपयांना मिळणार आहे.

  • बँकेचा हप्ता वाढणार –

रिझर्व्ह बँकेने रेपो दरात वाढ केलेली असल्याने अनेक बँकांनी एमसीएलआर दर वाढवले आहेत. त्याचा परिणाम सर्वसामान्यांच्या कर्ज आणि ईएमआयवर होणार आहे. सर्वसामान्यांना आता जादा रक्कम मोजीवी लागणार असल्याने, त्यांच्या खिशाला झळ बसणार आहे.


रेपो दर ६.५० टक्के – महागाई आटोक्यात आणण्यासाठी रिझर्व्ह बँकेची पावले, पण सामान्यांना महागाईचे चटके


  • रेल्वे वेळापत्रकात बदल –

उन्हाळा सुरू झाला असल्याने आता रेल्वे वेळापत्रकातही काही बदल होण्याची शक्यता आहे. प्राप्त माहितीनुसार आजपासून प्रवासी रेल्वे आणि मालगाड्यांच्या वेळापत्रकात बदल होणार आहे.

  • बँकांच्या सुट्ट्या  –

मार्च महिन्यात तब्बल १२ दिवस बँका बंद असणार आहेत. यामध्ये होळीसह अन्य प्रमुख सणांच्या दिवसांचा व नियमित सुट्यांचा समावेश आहे. त्यामुळे बँकेजी काम करण्यासाठी अगोदरच नियोजन करावे लागणार आहे.

  • सोशल मीडियाबाबत नियम –

अन्य गोष्टींबरोबरच आता सोशल मीडियासंदर्भातील नियमही बदलणार आहेत. प्रामुख्याने फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्वीटरवर अधिक बारकाईने लक्ष असणार आहे. धार्मिक भावना दुखावणाऱ्या, समाजात अशांतता निर्माण होईल अशा पोस्ट संदर्भात कडक नियम असणार आहेत. अशा पोस्ट करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईदेखील होणार आहे.

From March 1, the daily life of common people will be affected

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात