प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. राज्यभरात अवघ्या २ ते ३ रुपये किलोंवर कांद्याचे भाव आले आहेत. Onion purchase from Nafed started
याचे अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंगळवारी तीव्र पडसाद उमटले. शिंदे – फडणवीस सरकारने यावर तातडीने हस्तक्षेप करुन नाफेड सरख्या संस्थांना शेतमाल खरेदी करण्याच्या सूचना द्याव्यात तसेच केंद्र सरकारशी समन्वय साधून हे प्रश्न मार्गी लावण्याची मागणी विधान सभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उत्तर देत असताना विरोधकांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. हे पाहताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संतापले. नाफेडने कांदा खरेदी सुरू केली आहे. हे मुख्यमंत्री सांगताहेत पण विरोधकांकडे वेगळी माहिती असेल तर हक्कभंग आणावा, असे आव्हान फडणवीस यांनी विरोधकांना दिले.
अजित पवारांनी केलेल्या मागणीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते की, ‘कांदा उत्पादक शेतकऱ्यांसोबत सरकार पूर्णपणे पाठिशी उभे आहे. नाफेडने खरेदी सुरू केलेली आहे.’ या दरम्यानच विरोधकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली.
यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संतापले आणि म्हणाले की, ‘मुख्यमंत्री जेव्हा जबाबदारीने सांगतायत की, कांदा खरेदी सुरू झालेली आहे. सगळ्या प्रकारच्या कांद्याची खरेदी नाफेडने सुरू केलेली आहे. आपल्याला या ठिकाणी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मार्ग काढायचा आहे की राजकारण करायचे आहे, हे एकदा ठरवले पाहिजे. यासंदर्भात मुख्यमंत्री सांगतायत की, कांद्याची खरेदी नाफेडने सुरू केलेली आहे. तरीही यांच्याकडे वेगळी माहिती असेल तर विरोधकांनी हक्कभंग आणावा, अशा शब्दात फडणवीस यांनी आव्हान दिले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App