
विशेष प्रतिनिधी
मुंबई : आज (२७ फेब्रुवारी) जागतिक मराठी भाषा गौरव दिन. कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जयंतीदिनी हा दिवस साजरा केला जातो. यानिमित्ताने कुसुमाग्रजांनी मराठी भाषेची गायलेली महती त्यांच्याच गाजलेल्या कवितेतून : Today celebrating Marathi Bhasha Gaurav Din
माझ्या मराठी मातीचा, लावा ललाटास टिळा
हिच्या संगाने जागल्या, दर्याखोर्यांतील शिळा
हिच्या कुशीत जन्मले, काळे कणखर हात
ज्यांच्या दुर्दम धीराने, केली मृत्यूवरी मात
नाही पसरला कर, कधी मागायास दान
स्वर्णसिंहासनापुढे, कधी लवली ना मान
हिच्या गगनांत घुमे, आद्य स्वातंत्र्याची द्वाही
हिच्या पुत्रांच्या बाहूंत, आहे समतेची ग्वाही
माझ्या मराठी मातीला, नका म्हणू हीन दीन
स्वर्गलोकाहून थोर, मला हिचे महिमान
रत्नजडित अभंग, ओवी अमृताची सखी
चारी वर्णांतुनी फिरे, सरस्वतीची पालखी
रसरंगात भिजला, येथे शृंगाराचा स्वर
येथे अहंता द्रवली, झाले वसुधेचे घर
माझ्या मराठी मातीचा, नका करू अवमान
हिच्या दारिद्य्रात आहे, भविष्याचे वरदान
माझ्या मराठी मातीचा, लावा ललाटास टिळा
हिच्या संगे जागतील, मायदेशांतील शिळा
Today celebrating Marathi Bhasha Gaurav Din
महत्वाच्या बातम्या
- रामदास आठवले म्हणाले- शिवसेनेच्या समस्यांना उद्धव ठाकरेच जबाबदार, राहुल गांधी मजबूत नेते नाहीत
- द फोकस एक्सप्लेनर : काय आहे दिल्ली मद्य घोटाळा? सिसोदियांना नेमकी का झाली अटक, जाणून घ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर
- ‘भाजप आणि ओवेसी राम-श्यामची जोडी…’, संजय राऊत यांची टीका, एआयएमआयएमला म्हणाले – वोट कटिंग मशीन
Array