अफगाणी महिलांचे तालिबानला आव्हान : आपल्या हक्कांसाठी उरतल्या रस्त्यावर, महिला क्रांतीला सुरुवात

वृत्तसंस्था

काबूल : ऑगस्ट 2021 रोजी तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवला होता, त्यानंतर तालिबानने महिलांवर सर्व प्रकारचे निर्बंध लादले होते. महिलांना शिक्षण आणि नोकरी करण्यापासून रोखले. पण आता शनिवारी काबूलमधील महिलांच्या एका गटाने त्यांच्या मूलभूत आणि महिलांच्या हक्कांसाठी लढण्यासाठी क्रांतीची घोषणा केली आहे.Afghan Women’s Challenge to the Taliban The Women’s Revolution Begins on the Streets for Their Rights

महिलांच्या मूलभूत हक्कांचे रक्षण करणे हा या चळवळीचा उद्देश आहे. स्थानिक वृत्तानुसार, महिला स्वातंत्र्य, मुलींच्या शिक्षणावर आणि महिलांसाठी नोकऱ्यांवरील तालिबान-लादलेली बंदी उठवण्याची मागणी करत काबूलच्या रस्त्यावर उतरल्या आहेत. आयोजकांपैकी एक डोन्या साफी यांच्या मते, या चळवळीचे उद्दिष्ट नागरिकांच्या, विशेषत: महिलांच्या मूलभूत हक्कांचे संरक्षण करणे आहे, कारण मूलभूत अधिकारांपर्यंत पोहोचणे ही नागरिकांची नितांत गरज आहे.



एका स्थानिक वाहिनीशी बोलताना साफी या आंदोलक महिलेने सांगितले की, आम्ही महिलांवरील अन्याय आणि असमानतेविरोधात लढा देण्यासाठी हे अभियान सुरू केले आहे. साफी पुढे म्हणाल्या की, आंदोलनाच्या समर्थकांमध्ये विद्यार्थी, शिक्षक आणि महिलांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या अनेक माजी सरकारी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

महिलांच्या योगदानानेच समाजाची प्रगती शक्य

साफी यांच्या मते, महिलांच्या योगदानानेच समाजाची प्रगती होऊ शकते. त्यामुळे महिलांनी समाजात योगदान दिले नाही तर समाजाची प्रगती होणार नाही. देशाच्या प्रगतीमध्ये महिलांची भूमिका महत्त्वाची असूनही, सध्याच्या तालिबान सरकारमध्ये महिलांना सहभागी होण्याची परवानगी नाही.

आपल्याच देशात महिला निर्वासित

तालिबानने लादलेल्या निर्बंधांमुळे अफगाण महिलांना शिक्षणासारख्या मूलभूत गोष्टींशी संबंधित आव्हानांचा सामना करावा लागत आहे. त्याच वेळी, संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनी नुकत्याच दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, युद्धग्रस्त अफगाणिस्तानमधील महिला त्यांच्याच देशात निर्वासित जीवन जगत आहेत.

तालिबानच्या शिक्षणावरील बंदीमुळे अफगाण महिला आणि मुलींच्या मूलभूत अधिकारांवर गदा येत असल्याचा पुनरुच्चार यूएन प्रमुखांनी केला. संयुक्त राष्ट्राने एका निवेदनात म्हटले आहे की, गुटेरेस यांनी अफगाणिस्तानमधील महिला आणि मुलींच्या हक्कांबद्दल चिंता व्यक्त केली.

Afghan Women’s Challenge to the Taliban The Women’s Revolution Begins on the Streets for Their Rights

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात