विशेष प्रतिनिधी
पुणे : गिरीश बापट प्रचारात उतरले म्हणून विरोधकांना खुपले, पण “ते” तर अडीच वर्षात घरातच बसले!!, अशी अवस्था कसबा पोटनिवडणुकीत प्रचाराच्या अखेरच्या दिवसापर्यंत राहिली. गिरीश बापट, मुक्ता टिळक यांच्या ब्राह्मण जातीवरून आधी विरोधकांनी भाजपवर शरसंधान साधले. ज्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे राजकीय आयुष्य ब्राह्मण द्वेषात आणि ब्राह्मण समाजावर आरोप करण्यात गेले, त्यांना अचानक मुक्ता टिळकांच्या वारसांना उमेदवारी भाजपने नाकारल्याचा “साक्षात्कार” होऊन ब्राह्मण समाजावर अन्याय झाल्याचा “महासाक्षात्कार” झाला होता. त्यामुळे ब्राह्मण समाज दुखावल्याच्या बातम्या इतक्या मोठ्या प्रमाणात पसरवल्या की त्याचे नॅरेटिव्ह तयार होऊन आपल्याला त्याचा लाभ होईल, असा काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचा होरा होता. Girlish bapat and Uddhav Thackeray; differences of party loyalties came forward
पण आठवडाभरातच नाराजीच्या बातम्या विरल्या. उलट ब्राह्मण समाज नाराजीच्या बातम्या पेरल्याने कसब्यात वेगळेच पिक उगवले. त्यामुळे भाजप सजग झाला आणि कार्यकर्ते कामाला लागले. याचा परिणाम उद्याच्या मतदानानंतर काय दिसायचा तो दिसो, पण राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे दोन पक्ष मात्र आधीचा ब्राह्मण द्वेष आणि आता ब्राह्मण पुळका यामुळे पुरते “एक्स्पोज” झाले!!
जे काँग्रेस – राष्ट्रवादीचे, तेच शिवसेनेच्या ठाकरे गटाचे. गिरीश बापट अत्यंत आजारी असताना भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारात उतरले. म्हणजे ते एकाच मेळाव्यात आले आणि त्यांनी छोटेखानी भाषण केले. पण नेमके हेच काँग्रेस राष्ट्रवादीसह शिवसेनेच्या नेत्यांनाही खुपले आणि त्याचाच उद्घोष उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीत बसून कसब्यात केलेल्या प्रचारात केला. गेली अडीच वर्षे जे मुख्यमंत्री घराबाहेर पडले नाहीत, मंत्रालयात एखाद दुसरा अपवाद वगळता फिरकलेही नाहीत ते बापटांच्या पक्षनिष्ठेला वंदन करून त्यांच्यावर दोन चांगले शब्द बोलणे ऐवजी त्यांच्या दुखण्याचे राजकीय भांडवल करून त्या भांडवलाचा मतरूपी लाभ काँग्रेस उमेदवाराच्या पारड्यात पाडण्यासाठी आटापिटा करत होते.
गिरीश बापट आजारी पडल्यानंतर शरद पवार त्यांना 10 मिनिटांसाठी भेटून गेले. त्याचा उल्लेख शरद पवारांनी आपल्या भाषणातही केला पण उद्धव ठाकरे तर ते स्वतः आजारी असताना मातोश्री बाहेर पडलेच नव्हते, पण आजारातून बाहेर पडल्यानंतरही ते मातोश्रीतच बसल्याचे दिसले. शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर त्यांनी महाराष्ट्र पिंजून काढण्याच्या घोषणा मातोश्रीत बसून गेल्या. प्रत्यक्षात आदित्य ठाकरे यांना महाराष्ट्राच्या काही शहरांच्या दौऱ्यावर पाठवले. पण नंतर महाराष्ट्र पिंजून काढण्याच्या घोषणा स्वतःच पिंजून निघाल्या आणि आता जेव्हा बापट मनोहर पर्रीकरांसारख्या नेत्याचा आदर्श घेऊन आपली तब्येत सांभाळून प्रचारात उतरले, तेव्हा मात्र उद्धव ठाकरेंना अचानक त्यांचा आजार आठवला आणि भाजपचे अमानुषत्व आठवले!!, इतकेच…!!
वास्तविक आपण प्रचारात नसल्याची खंत गिरीश बापट यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना बोलून दाखवली होती. त्यांनी स्वतःच आग्रह करून मेळाव्यात येण्याची नुसती तयारी दाखवली नाही, तर ते प्रत्यक्ष आले. त्यांनी छोटे भाषणही केले. यामुळे त्यांची पक्षनिष्ठा उजळून निघाली. हीच पक्षनिष्ठा मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांनी राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीच्या वेळी दाखवली होती. कॅन्सर सारख्या गंभीर विकारान आजारी असताना ते ॲम्बुलन्स मधून विधिमंडळात येऊन मतदान करून गेले होते. आपल्या नेत्यांच्या पक्षनिष्ठा ही भाजपची त्या अर्थाने अंतर्गत बाब होती. पण विरोधकांनी मात्र त्या पक्षनिष्ठेची वेगळ्या प्रकारे खिल्ली उडवण्याचा प्रयत्न करून तेच “एक्स्पोज” झाले, हे कसबा आणि चिंचवड या दोन्ही पोटनिवडणुकांच्या निमित्ताने वेगळे वैशिष्ट्य समोर आले.
हत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App