वृत्तसंस्था
बंगळुरू : कर्नाटकमध्ये निवडणूक सभेला संबोधित करण्यासाठी आलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, काँग्रेस आणि जेडीएस हे घराणेशाहीचे पक्ष आहेत. हे लोक कर्नाटकचे काही चांगले करू शकत नाहीत. एका बाजूला मोदींचा भाजप आणि दुसऱ्या बाजूला राहुलबाबांची तुकडे- तुकडे गँग काँग्रेस आहे. तुम्हाला त्यांच्यापैकी एक निवडायचे आहे.Amit Shah accused Congress-JDS of dynasticism in Karnataka, said – Modi’s BJP on one side, Rahul’s tukde-tukde gang on the other
भाजप राज्याला भ्रष्टाचारमुक्त सरकार देईल, असे सांगून शहा यांनी जनतेला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांच्यावर विश्वास ठेवण्याचे आवाहन केले. पाच वर्षांत कर्नाटकला दक्षिण भारतात नंबर वन बनवणार. कर्नाटकात भाजप पूर्ण बहुमतासाठी लढत आहे.
काँग्रेस सरकारने पीएफआयवरील खटला घेतला मागे
अमित शहा म्हणाले- जेडीएसला दिलेले तुमचे प्रत्येक मत काँग्रेसला जाणार आहे. काँग्रेसला दिलेले प्रत्येक मत सिद्धरामय्या आणि त्यांच्या दिल्लीत बांधलेल्या एटीएम सरकारला जाणार आहे. ते म्हणाले, मोदी सरकारने पीएफआयवर बंदी घातली आहे. पण, काँग्रेस सत्तेत असताना पीएफआयविरुद्धचे 1700 खटले मागे घेण्यात आले.
शिवकुमार-सिद्धरामय्या यांच्या भांडणाने कल्याण होणार नाही
गृहमंत्री शहा पुढे म्हणाले- डीके शिवकुमार आणि सिद्धरामय्या दोघेही मुख्यमंत्रीपदासाठी भांडत आहेत. त्यांच्या भांडणाचा कर्नाटकला फायदा होणार नाही. कर्नाटकचे कल्याण करायचे असेल, तर राज्यात भाजपचे सरकार स्थापन करावे लागेल, तरच राज्याचा विकास होईल.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App