वृत्तसंस्था
उज्जैन : काशी विश्वनाथ धाम भव्य कॉरिडोर बनविल्यानंतर आणखी एका ज्योर्तिलिंग परिसरात असाच भव्य कॉरिडोर बनला आहे आणि तो म्हणजे उज्जैन नगरीतील महाकाल कॉरिडोर!! खरं म्हणजे महाकाल कॉरिडोर काशी विश्वनाथ कॉरिडोरपेक्षा चौपट मोठा आहे. काशी विश्वनाथ कॉरिडोर 5 हेक्टर एवढा आहे, तर महाकाल कॉरिडोर 20 हेक्टर वर फैलावला आहे. 11 ऑक्टोबर 2022 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाकाल कॉरिडोर देशाला समर्पित केला आहे. On the occasion of Mahashivratri, see the entire Mahakalche of Ujjain
प्रख्यात रूद्रसागर सरोवराभोवती विकसित होत असलेल्या या महाकाल कॉरिडोर मध्ये शिव शक्ती आणि अन्य धार्मिक, अध्यात्मिक मान्यतांच्या 200 हून अधिक भव्य मूर्ती आणि म्यूरल्स उभारण्यात आली आहेत. या मध्ये शिव शक्तिच्या अनेक कहाण्यांचा समावेश आहे. सप्तर्षी, नवग्रह मंडल, त्रिपूरासूर वध, कमलताल मध्ये विराजमान शिव, 108 स्तंभांमध्ये शिव आनंद तांडव अंकन, शिव स्तंभ, विशालकाय नंदी यांचा समावेश आहे.
या सर्व प्रकल्पाचा खर्च 793 कोटी रूपये आहे. या प्रकल्पातील पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले असून यात महाकाल पथ, महाकाल वाटिका, रुद्रसागर सरोवराच्या किनाऱ्याचा विकास सामील आहे.
रूद्रसागर सरोवराची सफाई
महाकाल कॉरिडोर बनविताना प्रथम रूद्रसागर सरोवराची सफाई केली. या सरोवरात तब्बल 12000 घरांचे सांडपाणी मिसळून जात होते. सरोवर पूर्ण खराब झाले होते. पाणी दूषित झाले होते. तेथे एवढे जलकुंभ होते की सरोवरातले पाणी शोधणे मुश्कील झाले होते. पण ते सगळं 8 महिने मेहनत घेऊन साफ केले. सरोवरातील पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत मोकळे केले. तलाव स्वच्छ पाण्याने भरला. पाण्याच्या जलशुध्दीकरणाची व्यवस्था सुरू आहे. या सरोवराच्या किनारीच भव्य महाकाल कॉरिडोर साकरला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App