प्रतिनिधी
पणजी : पोर्तुगीज तसेच बहामनी राजवटीत भारताचा देदीप्यमान इतिहास पुसण्याचा प्रयत्न झाला पण त्यानंतर, 1668 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या मंदिराची पुनर्बांधणी केली, ते गोव्यातील श्री सप्तकोटेश्वर मंदिर आज, 11 फेब्रुवारीपासून जीर्णोद्धारानंतर पुन्हा दर्शनासाठी खुले होते आहे. Modeled by Portuguese, but rebuilt by Chhatrapati Shivaji Maharaj, the Saptakoteshwar temple reopened after renovation!!
गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या पुढाकारातून सप्तकोटेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम मुंबईतील वास्तुसल्लागार राहुल चेंबुरकर यांच्या मार्गदर्शनात पूर्ण झाले आहे. भारताचे वैभव जपण्याचा हा अतिशय गौरवास्पद क्षण आहे.
गोव्याचे ‘राज दैवत’ असलेल्या श्री सप्तकोटेश्वर मंदिराचे आज लोकार्पण होते आहे आणि तेही छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांच्या हस्ते. हा एक दुर्लभ योग आहे. महाराष्ट्र, गोवा आणि देशभरातील जनतेला मी यानिमित्त शुभेच्छा देतो, अशा शब्दांत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आनंद व्यक्त केला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App