आज की शाम सिर्फ बाळासाहेब के नाम; टीव्ही स्क्रीनवर सायंकाळी फक्त आणि हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब!!

विशेष प्रतिनिधी

मुंबई : 23 जानेवारी 2023 आज की शाम सिर्फ बाळासाहेब के नाम अशीच अवस्था होती. कारण आज सायंकाळी टीव्ही स्क्रीनवर फक्त आणि फक्त बाळासाहेब दिसत होते. भले टीव्ही स्क्रीन दुभंगला असेल, पण दोन्हीकडे मात्र हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीच टीव्ही स्क्रीन व्यापला होता. एकीकडे बाळासाहेबांचे पठ्ठे त्यांच्या तैलचित्राचे विधिमंडळात अनावरण करत होते, तर दुसरीकडे त्यांचे पुत्र उद्धव बाळासाहेब ठाकरे आपणच बाळासाहेबांचे राजकीय खरे वारसदार असल्याचा दावा करत षण्मुखानंद हॉलमध्ये त्यांची जयंती साजरी करत होते. दोन्हीकडे फक्त आणि फक्त बाळासाहेब ठाकरे यांचाच विषय सुरू होता. Balasaheb Thackeray occupied the whole tv screen today evening, defeating Congress – NCP Dynasty politics

दोन्हीकडच्या कार्यक्रमांमध्ये अभाव होता, तो पवार नावाचा. महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे आणि पवार ही दोन्ही घराणी अव्वल. त्यांना वगळून महाराष्ट्राचे राजकारण करताच येणार नाही, असा महाराष्ट्रात करून दिलेला समज. पण आज तो समज वेगळ्या अर्थाने मोडला. बाळासाहेब ठाकरे यांच्यातील चित्राच्या अनावरण कार्यक्रमात शरद पवार उपस्थित नव्हते. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या मेळाव्यात त्यांनी उपस्थित असण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता. कारण तो कार्यक्रम फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा होता. पण विधिमंडळात बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राच्या अनावरण कार्यक्रमाचे निमंत्रण सर्व ज्येष्ठ वरिष्ठ नेत्यांना दिले होते. पण या कार्यक्रमाला शरद पवार, मनोहर जोशी आदी ज्येष्ठ नेते उपस्थित नव्हते. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार कार्यक्रमाला उपस्थित होते.

टीव्ही स्क्रीनवर एकाच वेळी दोन्ही ठिकाणचे कार्यक्रम दाखविण्यात आले. संजय राऊत यांचे भाषण सुरू असताना त्याच वेळी महाराष्ट्र विधिमंडळात अंबादास दानवे यांचे भाषण सुरू होते. पण दानवेंचे भाषण म्यूट केले होते, तर राऊतांचे भाषण लाईव्ह दाखवले होते. त्यानंतर उद्धव ठाकरेंचे भाषणही लाइव दाखवले गेले. विषय अर्थातच बाळासाहेबांच्या जैविक आणि वैचारिक वारसाचा होता. खोके – बोके, शिंदे – मिंधे वगैरे शब्दांची जुनीच रेलचेल या भाषणात होती. बाळासाहेबांचा वारसा समोरचे चोरून नेत असल्याचा आरोप त्यांनी केला.



त्याचवेळी विधिमंडळात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने आपणच बाळासाहेबांचे वैचारिक वारस असल्याचा इतकेच नाही तर केंद्रातले मोदी सरकार देखील बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचाच वैचारिक वारसा पुढे नेत असल्याचा निर्वाळा दिला. या सर्व राजकीय भांडणात फक्त आणि फक्त बाळासाहेबांचा वैचारिक वारसा त्यांचे हिंदुत्व याच गोष्टींनी महाराष्ट्रातला टीव्ही स्क्रीन व्यापला होता.

भले अजितदादांनी बाळासाहेबांनी मुस्लिम लीगची रा. सू. गवई यांच्याशी, नामदेव ढसाळ यांच्याशी युती केल्याची आठवण सांगितली. बाळासाहेब फक्त हिंदुत्ववादी नव्हते. ते सर्वांचे मोठे नेते होते, असे सांगितले पण अजितदादांचे भाषण हे अपवादात्मकच ठरले. बाकी सर्व नेत्यांच्या भाषणांमध्ये बाळासाहेब आणि हिंदुत्व हेच अतूट नाते दिसले. उलट अजितदादांच्या भाषणाच्या पार्श्वभूमीवर नारायण राणे, राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब आणि हिंदुत्व हेच नाते वारंवार अधोरेखित करून सांगितले. बाळासाहेबांच्या तैलचित्राखाली हिंदुहृदयसम्राट हे लिहिले आहे याचा अभिमान वाटत असल्याचे या सर्व नेत्यांनी सांगितले. हा उल्लेख आधी अजितदादांनी केला होता. त्यामध्ये शिवसेनाप्रमुख हा शब्द आवर्जून वापरला पाहिजे अशी सूचना त्यांनी केली होती. पण बाकी सर्व नेत्यांनी मात्र बाळासाहेबांचे हिंदुहृदयसम्राट हेच बिरूद ठासून सांगितले.

सर्वसामान्य विषयी कळकळ धाडस आणि हिंमत असेल तर आपल्याला कोणाला घाबरायचे कारण नाही. हीच शिकवण बाळासाहेबांनी आपल्याला दिल्याचे सांगून एकनाथ शिंदे यांनी आपल्या राजकीय उठावाचे समर्थन केले. पण दोन्हीकडे फक्त आणि फक्त बाळासाहेब व्यापून राहिले होते!! महाराष्ट्रातील काँग्रेसी घराणी यात खूप मागे सुटून गेली होती!!

Balasaheb Thackeray occupied the whole tv screen today evening, defeating Congress – NCP Dynasty politics

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात