दावोस मधील गुंतवणूक, केंद्रीय सहकार मंत्रालय, जलयुक्त शिवार योजना; वसंतदादा इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमात पवारांसमोर मुख्यमंत्र्यांची उत्तरे

प्रतिनिधी

पुणे : दावोस मधून महाराष्ट्रात आणलेली गुंतवणूक हा शिंदे – फडणवीस सरकारचा खोटा दावा असल्याची टीका विरोधी पक्षांनी केली होती. या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमात शरद पवार यांच्यासमोरच थेट उत्तर दिले. CM eknath shinde gave befitting reply to all allegations regarding davos investment, union cooperative ministry and jalyutk shivar yojana in front of sharad Pawar

वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूट च्या 46 व्या वार्षिक सर्वसाधारण सभा कार्यक्रमात शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकाच व्यासपीठावर असण्याच्या बातम्या मराठी माध्यमांनी केल्या होत्या. हे दोन्ही नेते एकत्र असल्यावर नेमके काय बोलणार?, याची उत्सुकता महाराष्ट्रात असल्याचे मराठी माध्यमांनी बातम्यांमध्ये म्हटले होते.

या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी शिंदे – फडणवीस सरकार वरील काँग्रेस – राष्ट्रवादीने लावलेले सर्व आरोप शरद पवार यांच्यासमोर फेटाळून लावले. शरद पवार हे नेहमीच मार्गदर्शकाच्या भूमिकेत असतात सरकार कोणाचेही असले तरी ते सूचना करून राज्याच्या विकासाच्या दृष्टीने प्रयत्नशील राहतात. आता कोणीही काहीही म्हणत असले तरी दावोसमधून आणलेली गुंतवणूक महाराष्ट्राच्या सर्व भागात पोहोचणार आहे. तिथे जे करार झाले त्यानंतर त्याची अंमलबजावणी होणार असून महाराष्ट्रातल्या विविध भागात उद्योग उभे राहणार आहेत. यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आरोपांना शरद पवार यांच्या समोरच प्रत्युत्तर दिले.


हसावे परी कीर्तीरूपे उरावे, हसून “काहीतरी” सांगून जावे!!; ही दोन हास्ये नेमके सांगतात तरी काय??


त्याचवेळी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे असलेल्या सहकार खात्याचा देखील उल्लेख केला. महाराष्ट्रातल्या सहकारी चळवळीला ताकद देण्यासाठी अमित शाह हे देखील सहकार्य करत असतात. ते वेगवेगळ्या सूचना करतात त्याची अंमलबजावणी आमचे सरकार निश्चित करेल, अशी ग्वाही त्यांनी शरद पवार यांच्यासमोर दिली.

राज्यातल्या जलयुक्त शिवार योजनेला काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसने विरोध केला होता. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे ठाकरे – पवार सरकार असताना ही योजना गुंडाळून ठेवली होती. परंतु शिंदे – फडणवीस सरकार आल्यानंतर ही योजना पुन्हा सुरू केली. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात आवर्जून उल्लेख केला. महाराष्ट्रातली जास्तीत जास्त जमीन सिंचनाखाली आणण्याचा उद्देश असल्याने महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजना पुन्हा सुरू केल्याचे आणि ती वेगाने सुरू राहणार असल्याची खात्री मुख्यमंत्र्यांनी शरद पवार यांच्यासमोर दिली.

– जयंत पाटलांना टोला

भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी जयंत पाटलांना टोला हाणला. शरद पवार नेहमीच गोड बोलतात. त्यांच्या तोंडात साखर असते जयंत पाटलांच्याही तोंडात साखर असते. मी अजितदादांसमोर विधिमंडळ अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी तीच आठवण काढली म्हटलं समोर जयंतराव नाहीत. त्यामुळे मजा नाही, असे मी अजितदादांना म्हणालो, असा टोला मुख्यमंत्र्यांनी जयंत पाटलांना लगावला. जयंत पाटील यांचे विधिमंडळ अधिवेशनाच्या कालावधीसाठी निलंबन झाले होते. याची खोचक आठवण मुख्यमंत्र्यांनी या कार्यक्रमात करून दिली.

CM eknath shinde gave befitting reply to all allegations regarding davos investment, union cooperative ministry and jalyutk shivar yojana in front of sharad Pawar

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात