वृत्तसंस्था
नवी दिल्ली : संसदेचे हिवाळी अधिवेशन नव्या संसद भवनात 31 जानेवारीपासून सुरू होणार आहे 1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन याच नव्या संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर करतील. या पार्श्वभूमीवर वेगळे औचित्य साधत संरक्षण मंत्रालयाने यंदाच्या प्रजासत्ताक दिनी विशेष सन्मान म्हणून सेंट्रल विस्टा आणि नवीन संसद भवन बांधणाऱ्या श्रमयोगींना निमंत्रण दिले आहे. कर्तव्यपथावर होणाऱ्या संचलन कार्यक्रमाच्या वेळी हे सर्व श्रमयोगी राष्ट्रपतींच्या व्यासपीठासमोरच्या विशेष विभागात बसतील. CENTRAL VISTA – The Shram Yogis who are building the new Parliament House are special invitees for this year’s Republic Day
अमृतकलातील प्रजासत्ताक दिन हा विशेष महत्त्वाचा आहेच. शिवाय या प्रजासत्ताक दिनानंतर सेंट्रल विस्टाचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे नवे संसद भवन याचे कामकाज प्रजासत्ताक दिना नंतर लगेच सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर सेंट्रल विस्टा आणि संसद भवन बांधणाऱ्या श्रमयोगींना केंद्र सरकारने विशेष सन्मानपूर्वक प्रजासत्ताक दिन कार्यक्रमाचे निमंत्रण दिले आहे. या श्रमयोगींबरोबरच भाजीविक्रेते आणि दूध विक्रेते यांना देखील याच कार्यक्रमाचे खास निमंत्रण देण्यात आले आहे.
श्रमयोगींचा सन्मान हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टीने अत्यंत जिव्हाळ्याचा विषय राहिला आहे. ज्या श्रमयोगींनी काशी विश्वनाथ धाम कॉरिडॉरचे बांधकाम केले, त्या श्रमयोगींना पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्यक्ष भेटले आणि उद्घाटनाच्या दिवशी या सर्वांवर फुले उधळून त्यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त केली होती.
सेंट्रल विस्टा आणि नवीन संसद भवनाचे बांधकाम प्रत्यक्ष सुरू असताना पंतप्रधान मोदी इथल्या श्रमयोगींना आधी भेटले आहेत. आता प्रजासत्ताक दिनी त्यांना विशेष निमंत्रित म्हणून कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App