हिमाचलात सत्तांतरानंतर काँग्रेस सरकारची डिझेलच्या व्हॅटमध्ये 3 रुपयांची वाढ

वृत्तसंस्था

शिमला : हिमाचल प्रदेशात सत्तांतरानंतर राज्यातील काँग्रेस सरकारने डिझेलच्या किंमतीवरील मूल्यवर्धित कर अर्थात व्हॅटमध्ये 3.00 रुपयांची वाढ केली आहे. यापूर्वी राज्यात डिझेल 83.02 रुपये प्रति लिटर होते. त्यात आता वाढ होऊन डिझेलचे दर 86.05 रुपये प्रति लिटर झाले आहेत. After coming to power in Himachal, the Congress government increased the VAT of diesel by Rs 3

या सोबतच देशातील महाराष्ट्र, केरळ, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान आणि उत्तराखंड या राज्यांमधील काही शहरांमध्ये इंधन दरांत किरकोळ बदल झाले आहेत. पश्चिम बंगालमध्ये पेट्रोल 0.44 रुपयांनी वाढून 107.51 रुपये आणि डिझेल 0.41 रुपयांनी वाढून 94.14 रुपये प्रतिलिटर झाले आहे. तसेच उत्तर प्रदेश, झारखंड, जम्मू-काश्मीर आणि गोव्यात पेट्रोल-डिझेल महाग झाले आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6.00 वाजता बदलून नवे दर जारी केले जातात.


हिमाचलमध्ये सुखविंदर सिंह सुक्खू मुख्यमंत्री; वीरभद्र सिंहांचा वारसा काँग्रेस हायकमांडने नकारला; जगन मोहन रेड्डी इन मेकिंग!!


पेट्रोल, डिझेलच्या दरात एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते.

देशात तब्बल 7 महिन्यांहून अधिक काळापासून पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. परंतु, दरम्यानच्या काळात काही राज्यांनी व्हॅटमध्ये केलेली कपात यामुळे काही राज्यांतील दरांमध्ये बदल झाले होते.

 मोठ्या शहरांतील पेट्रोल-डिझेलचे दर

  • – दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर
  • – मुंबईत पेट्रोलचा दर 106.31 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर
  • – कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा 92.76 रुपये प्रति लिटर
  • – चेन्नईत पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर

After coming to power in Himachal, the Congress government increased the VAT of diesel by Rs 3

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात