अखिलेश यादवांचे बिगड़े बोल; यूपी पोलिसांचा चहा नको, त्यात विष मिसळले असेल तर…!!

विशेष प्रतिनिधी

लखनौ : तसाही पोलिसांचा चहा कडवटच असतो… पण अखिलेश यादवांनी त्यात विष मिसळल्याचा संशय व्यक्त केला आहे… उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी आणि भाजप यांच्यात सुरू असलेल्या ट्विटर वॉर दरम्यान समाजवादी पार्टीचा आयटी सेल प्रमुख सोशल मीडिया हँडलर मनीष जगन अग्रवाल याला सोडवायला गेलेल्या अखिलेश यादव यांनी लखनऊ पोलीस मुख्यालयात पोलिसांचा चहा नाकारला. चहा प्यायचाच तर आम्ही बाहेरून मागवून चहा पिऊ. तुम्ही तुमचा चहा प्या. तुमच्या चहात विष मिसळले असेल तर कोणी सांगावे!!, असे बिगड़े बोल अखिलेश यादव यांनी काढले आहेत. Bad words of Akhilesh Yadav; Don’t want UP police tea, if it has poison in it

भाजपच्या आयटी सेल मधील सोशल मीडिया हँडलर डॉ. ऋचा राजपूत यांना समाजवादी पार्टीच्या ट्विटर हँडल वरून बलात्कार आणि हत्येची धमकी देण्यात आली होती. त्याविरुद्ध ऋचा राजपूत यांनी लखनऊ पोलिसांमध्ये तक्रार दिली होती. या तक्रारीवरून समाजवादी पार्टीचा सोशल मीडिया हँडलर मनीष जगन अग्रवाल याला पोलिसांनी अटक केली. त्यालाच सोडवायला अखिलेश यादव लखनऊ पोलीस मुख्यालयात पोहोचले. तेथे पोलिसांबरोबर त्यांचा हा वाद झाला. अखिलेश यादव पोलिसांच्या चहा विषयी संशय व्यक्त करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. त्यामुळे त्यांच्यावर सध्या सगळीकडून टीकेची झोड उठली आहे.

अखिलेश यादव माजी मुख्यमंत्री आहेत. सध्या विधानसभेतले विरोधी पक्ष नेते आहेत. त्यामुळे पोलिसांनी त्यांना लखनौ मुख्यालयात आल्यानंतर सौजन्याने चहा घेणार का?, म्हणून विचारले त्यावर त्यांनी तुमच्या चहात विष मिसळले असेल तर??, असा सवाल करून पोलिसांचा चहा नाकारला.

 मराठी पोलीस आयुक्त

समाजवादी पार्टी आणि भाजप यांच्यातले ट्विटर वॉर सध्या जोरात रंगले असून दोन्ही बाजूंनी एकमेकांविरुद्ध एफआयआर नोंदवले आहेत. लखनऊचे मराठी पोलीस आयुक्त एसबी शिराडकर स्वतः या प्रकरणात लक्ष घालत आहेत आणि दोन्ही पक्षांचे भांडण सोडवत आहेत. सध्या 4 एफआयआर नोंदवले आहेत. जशा तक्रारी येतील तशा एफआयआर नोंदवून कायदेशीर कारवाया केल्या जातील, असे शिराडकर यांनी सांगितले.

अखिलेश यादव यांना उत्तर प्रदेश पोलिसांचा चहा कडवट लागतो. त्यात त्यांना विष मिसळल्याचा संशय येतो. पण अखिले यांचा दहशतवाद्यांवर मात्र विश्वास आहे, असा टोला भाजपचे प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी लगावला आहे.

Bad words of Akhilesh Yadav; Don’t want UP police tea, if it has poison in it

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात