गेले ते कचरा, संजय राऊतांचे वक्तव्य; 8 – 10 दिवसांत ठाकरे गट रिकामा होणार, संजय शिरसाटांचे प्रत्युत्तर

प्रतिनिधी

मुंबई : ठाकरे गटातील गळतीचे वर्णन संजय राऊत यांनी गेले ते कचरा होते, असे केले, तर ठाकरे गट 8 – 10 दिवसांत रिकामा होईल, असे प्रत्युत्तर आमदार संजय शिरसाटांनी दिले आहे. एकनाथ शिंदे यांनी क्रांती नाही, गद्दारी केली. उद्धव ठाकरेंना आजारपणात दगा दिला. पण खरी क्रांती महाराष्ट्रात जनता करेल. उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होतील, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. Sanjay Raut targets shinde faction, Sanjay shirsat targets Sanjay Raut

तर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. संजय राऊत यांनी शिवसेना संपवण्याचे काम सुरु केले आहे. राऊतांच्या बडबडीची ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दखल घेत नाहीत, याचा अर्थ उद्धव ठाकरे यांच्यावर राऊतांचा दबाव आहे, असा आरोपही शिरसाट यांनी केला. तसेच, 8 ते 10 दिवसांत ठाकरे गट रिकामा होईल, असा दावा शिरसाट यांनी केला आहे.


Sanjay Raut : राज ठाकरे पुन्हा म्हणाले, “लवंडे”; फडणवीस म्हणाले, “बिनकामाचे”!!


राणेंच्या वक्तव्याचे शिरसाटांकडून समर्थन

शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी नारायण राणे यांच्या वक्तव्याचे समर्थन केले. शिंदे गटाने उठाव केला तेव्हा मी हेच म्हणालो होतो. शिवसेना संपवण्याचे काम संजय राऊत करत आहेत. संजय राऊत यांना शिवसेना वाढावी असे वाटत नाही, ते शिवसेना संपवत आहेत. राऊत हे आपले अस्तित्त्व टिकवण्याची ही धडपड करत आहेत, असे शिरसाट म्हणाले.

उद्धव ठाकरेंना हे का कळत नाही?

सुषमा अंधारे यांना शांत करण्यात आले आहे. मात्र, संजय राऊत यांचे सुरुच आहे आणि ते शिवसेना संपवल्यावरच थांबतील, असे शिरसाट म्हणाले. शिवसेनेतील मोठे नेते संजय राऊत यांच्यामुळे गेले. उद्धव ठाकरे याची का दखल घेत नाहीत ते कळत नाही, असे शिरसाट म्हणाले. संजय राऊत जेलमधून सुटून आल्यावर उद्धव ठाकरे यांनी ज्याप्रकारे संजय राऊत यांचे स्वागत केले होते. हे इतिहासात पहिल्यांदा घडले आहे. कोणाला भेटायचेच होते तर उद्धव ठाकरेंनी त्या पत्राचाळीतील लोकांना भेटायची गरज होती, असेही शिरसाट म्हणाले.

Sanjay Raut targets shinde faction, Sanjay shirsat targets Sanjay Raut

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात