प्रतिनिधी
भिवंडी : भिवंडी येथे मेरी पाठशाला या संस्थेने सुरू केलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनात धक्कादायक प्रकार घडला आहे. आंदोलक विद्यार्थ्यांनी यावेळी पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्याने गोंधळ निर्माण झाला. पोलिसांनी यावेळी १९ आंदोलक विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले. Pakistan Zindabad slogans in Bhinwadi; 19 students in police custody
भाषणात पाकिस्तान झिंदाबाद
भिंवडी येथे गेल्या ३ दिवसांपासून विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. या विद्यार्थ्यांना मेरी पाठशाला या संस्थेने पाठबळ दिले आहे. मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी या विद्यार्थ्यांनी महापालिकेसमोर ठिय्या आंदोलन सुरू केले होते. परंतु या आंदोलनादरम्यान एका विद्यार्थ्याने भाषण देताना पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या. यानंतर याठिकाणी गोंधळ सुरू झाला.
१९ जण पोलिसांच्या ताब्यात
या घडलेल्या प्रकारची माहिती कळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची होऊन पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला. यामध्ये आतापर्यंत १४ पुरूष आणि ५ महिला अशा १९ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App