किरीट सोमय्या अ‍ॅक्शन मोडमध्ये; ठाकरे कुटुंबाविरोधात रेवदंडा पोलीसात तक्रार दाखल

प्रतिनिधी

मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे कुटुंबियांविरोधात अलिबागच्या रेवदंडा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे तसेच वायकर कुटुंबियांनी कोर्लईत 19 बंगल्यांचा घोटाळा केल्याचा आरोप सोमय्यांनी केला आहे. Kirit Somayya in action mode

तत्कालीन जिल्हाधिकारी निधी चौधरी व झेडपी सीईओ किरण पाटील यांनी या घोटाळ्यात सहकार्य केले. तेव्हा ठाकरे आणि वायकर कुटुंबाबरोबरच या दोन्ही अधिका-यांवरदेखील फौजदारी स्वरुपाचे गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे. पुढील 8 दिवसांत तपास करुन गुन्हे दाखल होतील, असे आश्वासन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी दिल्याचे सोमय्या यांनी यावेळी म्हटले आहे.

5 नेते नवीन वर्षात सोमय्यांच्या टार्गेटवर 

नव्या वर्षात घोटाळे बाहेर काढणार असल्याचे किरीट सोमय्या यांनी ट्वीट करत जाहीर केले होते. याबाबत केलेल्या ट्वीटमध्ये 5 नेत्यांची नावे त्यांनी जाहीर केली. उद्धव ठाकरे आणि त्यांचे कुटुंब, ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांचे साई रिसाॅर्ट प्रकरण किरिट सोमय्या यांच्या निशाण्यावर आहे. यासह राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ, काॅंग्रेसचे नेते अस्लम खान आणि ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांच्या नावाचाही उल्लेख सोमय्या यांनी आपल्या ट्वीटमध्ये करत मविआला इशारा दिला आहे.

उद्या पासून सुरू होणाऱ्या नवीन वर्षात

  • ठाकरे परिवाराचे १९ बंगले
  • अनिल परब
  • हसन मुश्रीफ
  • असलम खानचे 49 स्टुडिओ
  • किशोरी पेडणेकर एस आर ए सदनिका
  • मुंबई महापालिका

यांचा घोटाळ्यांचे हिशोब करणार, असे किरीट सोमय्यांनी ट्विट कालच केले आहे.

Kirit Somayya in action mode

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात