वृत्तसंस्था
नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निधी संघटनेच्या सदस्यांनी वाढीव निवृत्तीवेतन मिळावे, यासाठी सुप्रीम कोर्टाच्या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी ईपीएफओने (EPFO) एक परिपत्रक जारी केले आहे. त्यानुसार उच्च वेतनातून जास्त योगदान देणारे आणि वाढीव पेन्शनचा पर्याय निवडणारे सदस्य यासाठी पात्र ठरणार आहेत. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणी 8 आठवड्यांत करण्यात येईल. ईपीएस-95 योजनेतील सदस्य एकूण पगारावर 8.33 % योगदान जमा करु शकतील. यापूर्वी 15 हजार रुपयांची मर्यादा होती. Enhanced Pension to Employees, Guidelines issued by EPFO
वाढीव पेन्शनसाठी ‘हे’ आहेत पात्र कर्मचारी
वाढीव निवृत्ती वेतनासाठी पुढील निकषात बसणारे कर्मचारी पात्र असतील. असे ईपीएस सदस्य ज्यांनी तत्कालीन वेतन मर्यादा 5 हजार आणि 6 हजार 500 नुसार योगदान दिले आहे.
ईपीएस -95 चे सदस्य म्हणून ज्यांनी ईपीएसच्या सुधारणापूर्व योजनेत संयुक्त पर्याय निवडला आहे. असे सदस्य ज्यांचा पर्याय ईपीएफओने फेटाळला आहे.
पात्र कर्मचाऱ्यांना अशी मिळणार वाढीव पेन्शन
वाढीव पेन्शन ईपीएस सदस्यांनी नजीकच्या ईपीएफओ कार्यालयात जाऊन आवश्यक अर्ज योग्य कागदपत्रांसह भरुन द्यायचा आहे.
आयुक्तांच्या निर्देशानुसार, अर्ज भरुन विनंती करावी, प्रमाणीकरणाच्या अर्जात अस्वीकरणाचा समावेश वरील अधिसूचनेनुसार असेल.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App