अमित शाह यांचा गंभीर आरोप
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) गुरुवारी केरळमधील प्रतिबंधित संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) विरोधात मोठी कारवाई केली. एनआयएच्या अनेक पथकांनी केरळ राज्यात पीएफआयच्या 56 ठिकाणांवर छापे घातले होते. या छापेमारीतून एनआयएला महत्त्वाची माहिती मिळाली आहे. vPFI terrorist plot training; Revealed by NIA raids
पीएफआय ठिकाणांवर शस्त्रे वापरण्याचे प्रशिक्षण
पीएफआयच्या राज्य कार्यकारी समितीने 7 सदस्य, विभागीय प्रमुख, 12 जिल्ह्यांमधील 15 शारीरिक प्रशिक्षक आणि 7 कॅडर यांच्या निवासस्थानांवर हे छापे घातले. पीएफआयच्या ठिकाणांवर लोकांना चाकू, तलवारी आणि इतर शस्त्रे वापरण्याचे प्रशिक्षण देण्यात येत होते. अशी माहिती एनआयएच्या प्रवक्त्याने दिली. तसेच २० संशयितांवर कारवाई करण्यात आली असल्याची माहितीही या अधिकाऱ्याने दिली आहे.
एर्नाकुलममध्ये १३, कन्नूरमध्ये ९, मलप्पुरममध्ये ७, वायनाडमध्ये ६, कोझिकोडमध्ये ४, तिरुवनंतपुरम, कोल्लम, पठाणथिट्टा आणि अलाप्पुझा येथे प्रत्येकी ३, त्रिशूर आणि कोट्टायमध्ये प्रत्येकी २, पलक्कडमध्ये एका ठिकाणी ही छापेमारी करण्यात आल्याचे एनआयएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
– सिद्धरामय्यांवर आरोप
दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. पीएफआय सारख्या दहशतवादाला चिथावणी देणाऱ्या संघटनेच्या तब्बल 1800 म्होरक्यांवरच्या केसेस सिद्धमरामैया यांनी मागे घेतल्या. त्यांना कर्नाटक आणि दक्षिणेतल्या राज्यांमध्ये मोकळे रान करून दिले, असा आरोप अमित शाह यांनी कर्नाटकात बेल्लारी येथून केला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App