प्रतिनिधी
मुंबई : व्यवस्थापन क्षेत्रात अत्यंत कामगिरीबद्दल प्रत्यक्ष इंग्लंडच्या राजाकडून शाबासकी मिळवणारे मुंबईचे डबेवाले आज सावरकर राष्ट्रीय स्मारकात पोहोचले आणि तिथला लाईट अँड साऊंड शो पाहून भारावले. Dabwale of Mumbai reached the Savarkar National Memorial
भारतीय स्वातंत्र्य लढ्यात स्वातंत्र्यवीर सावरकर आणि असंख्य क्रांतिकारकांनी जी कामगिरी बजावली जे बलिदान केले ते पाहून मुंबईच्या डबेवाल्यांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. मुंबईतील डबेवाल्यांच्या संघटनेच्या कार्यकारिणीच्या शिष्टमंडळाने स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाला भेट दिली. स्मारकाचे कार्य समजावून घेतले. सावरकरांचे सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू समजावून घेतले.
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक समितीच्या कार्यकारिणी अध्यक्षपदी निवृत्त पोलीस महासंचालक प्रविण दीक्षित, कार्याध्यक्ष पदी रणजित सावरकर, कोषाध्यक्ष पदी मंजिरी मराठे, कार्यवाहपदी राजेंद्र वराडकर यांची तर, सह कार्यवाह पदी स्वप्नील सावरकर यांची नियुक्ती झाल्याबद्दल डबेवाला संघटनेने त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी समिती कक्षाच्या वतीने संजय चेंदवणकर यांनी स्वागत केले. या सदिच्छा भेटी दरम्यान सावरकरांच्या जीवन चरित्राचा मागोवा घेणाऱ्या भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास कथन करणाऱ्या आणि अनोख्या तंत्रज्ञानाचा अविष्कार असलेला लाईट अँड साऊंड शो पहिल्यांदा पाहण्याचा योग या सर्वांना आला. खरोखर हा शो प्रत्येक व्यक्तीने आवर्जून पहावा आणि आपल्या मुलांनाही दाखवावा ज्या योगे स्वातंत्र्य प्राप्तीस्तव सावरकर आणि असंख्य स्वातंत्र्य सैनिकांनी दिलेल्या बलिदानाची आपणांस जाणीव होईल, अशा भावना डबेवाले संघटनेने व्यक्त केल्या आहेत. डबेवाले संघटनेचे प्रवक्ते आणि आंबोली गावचे सरपंच विष्णू काळडोके यांनी फेसबुक पोस्ट लिहून सावरकर स्मारकाच्या भेटीचे वर्णन केले आहे.
मंजिरी मराठे यांनी यावेळी डबेवाले संघटनेचे आभार मानून शिष्टमंडळास स्वालिखित स्वातंत्र्यवीर सावरकर हे चरित्र पुस्तक भेट दिले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App