प्रतिनिधी
नागपूर : हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षाने शिवसेना उबाठाचे नेते आदित्य ठाकरे यांना घेरले आणि दिशा सालियन प्रकरणात शिंदे फडणवीस सरकारला एसआयटीमार्फत चौकशीची घोषणा करावी लागली. दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरून हिवाळी अधिवेशनात एकच गदारोळ पाहायला मिळाला. यावेळी विरोधकांकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी चांगल्याच झाडल्या गेल्यात. दिशा सालियनच्या मृत्यूवेळी तिच्या घरी कोणता मंत्री होता?, याची चौकशी करण्याची मागणी नितेश राणे आणि भरत गोगावले यांनी केली. यानंतर विधानसभेतील सभागृहातील झालेल्या प्रचंड गदारोळ झाला. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली. Aditya in trouble in Disha Salian case; Probe by SIT
काय केली फडणवीसांनी घोषणा
दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची अखेर एसआयटी मार्फत चौकशी होणार आहे. राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत घोषणा केली आहे. फडणवीस यांच्या या घोषणेनंतर माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे अडचणीत येऊ शकतात. इतकेच नाहीतर आदित्य ठाकरेंची कोंडी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विधानसभेत बोलताना फडणवीस म्हणाले की, सध्या ही केस पोलिसांकडे असून कोणाकडे यासंदर्भातील काही पुरावे असतील तर ते द्यावेत. दिशा सालियान केस कधीही सीबीआयकडे गेली नाही. सुशांतसिंग राजपूत यांची केस सीबीआयकडे होती. असे नवीन पुरावे आले असतील तर त्यांची चौकशी केली जाईल, असेही फडणवीसांनी सांगितले.
अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी विधानसभेत दिशा सालियानच्या संशयास्पद मृत्यूचे प्रकरण भरत गोगावले आणि नितेश राणेंनी उपस्थित केले. दिशा सालियानचा पोस्टमार्टेम रिपोर्ट समोर न येणे हे प्रकरण गंभीर आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी मुंबई पोलिसांनी करावी, अशी मागणी गोगावले आणि नितेश राणेंनी केली. दिशा सालियानचा मृत्यू झाला त्या रात्री तिथे कोणता मंत्री हजर होता?, असा सवाल करत नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App