प्रतिनिधी
पुणे : पुण्यात एमपीएससीचा अभ्यास करणारे विद्यार्थी चांगलेच आक्रमक झाले. विविध मागण्यांसाठी आज, सोमवारी पुण्यातील नवी पेठेत एमपीएससी करणारे विद्यार्थी आंदोलन करीत रस्त्यावर उतरले. MPSC students protest in Pune; Demands for curriculum and pattern improvement
काय आहेत विद्यार्थ्यांच्या मागण्या?
राज्य सेवा पूर्व 2023 ची परीक्षा 4 जून रोजी असून त्यामध्ये लाखो विद्यार्थी ही परीक्षा देणार असून ही पूर्व परीक्षा पास होणे आव्हानात्मक असते. म्हणून राज्य सेवा पूर्व परीक्षा पास होणे विद्यार्थ्यांसाठी आव्हानात्मक असते. म्हणून पूर्वचा किमान 5 – 6 महिने अभ्यास होणे गरजेचा असल्याने वेळ मिळावा ही विद्यार्थ्यांची सामान्य मागणी आहे.
नवीन पॅटर्न 2025 ला लागू केला तर जुन्या पद्धतीने अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना शेवटच्या दोन संधी मिळतील, ज्यांना नवीन पॅटर्ननुसार तयारी करायची आहे ते 2025 साठी तयारी करतील परंतु, पॅटर्न लागू करण्याची घाई झाली तर बहुतांश विद्यार्थ्यांचे नुकासान आहे. याबाबत शासनाने विचार करावा.
अभ्यासक्रम जसाच्या तसा यूपीएससीचा कॉपी पेस्ट आहे. त्यामुळे एमपीएससीच्या मुलांना अजून कोणतेही संदर्भ साहित्य उपलब्ध नाही त्यामुळे यामध्ये सुधारणा करण्यात यावी, अशा मागण्या विद्यार्थ्यांनी केल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App