बोम्मईंच्या वादग्रस्त ट्विट मागे दुसऱ्याच राष्ट्रीय पक्षाचा कार्यकर्ता; लवकरच कारवाई; बोम्मईंचे शिंदेंना आश्वासन

प्रतिनिधी

नागपूर : महाराष्ट्र – कर्नाटक सीमा प्रश्न पेटलेला असताना, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी रविवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवरून चर्चा केली. आपल्या नावे ट्विट करणाऱ्या व्यक्तीचा शोध लागलेला आहे. तो दुसऱ्याच एका राष्ट्रीय पक्षाचा कार्यकर्ता आहे. त्याच्यावर लवकरच कारवाई करू, असे आश्वासन बोम्मई यांनी शिंदे यांना यावेळी दिले. Another national party worker is behind Bommai’s controversial tweet

विधिमंडळाचे अधिवेशनाबाबत मुख्यमंत्री आपल्या गटाच्या काही खासदारांशी रामगिरी या नागपुरातील शासकीय निवासस्थानी चर्चा करत होते. त्याचवेळी बोम्मई यांचा त्यांना फोन आला. मुख्यमंत्री शिंदे आतील खोलीत गेले आणि त्यांची बोम्मई यांच्याशी सुमारे 20 मिनिटे चर्चा झाली. कर्नाटकमध्ये मराठी बांधवांवर हल्ले झाले तर त्याचे पडसाद महाराष्टात उमटतील. दोन्ही राज्यांसाठी ही बाब योग्य नाही तेव्हा संयम राखणे आवश्यक आहे, अशी विनंती शिंदे यांनी बोम्मई यांना केली. त्याला बोम्मई यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला, अशी माहिती मिळाली आहे.



मंत्र्यांची समिती स्थापन होणार 

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अलीकडेच मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बोम्मई यांची एकत्रित बैठक दिल्लीत बोलावली होती. त्यावेळी दोन्ही राज्यांच्या 3 – 3 मंत्र्यांची एक समिती स्थापन करण्याचे ठरले होते. आपणाकडून 3 मंत्र्यांची नावे लवकर निश्चित करा, आम्ही ती निश्चित करत आहोत, असे बोम्मई यांनी शिंदे यांना सांगितल्याची माहिती आहे.

बोम्मई यांनी सीमा प्रश्न पेटलेलला असताना, एक ट्वीट केले होते, ते वादग्रस्त ठरले. आता हे वादग्रस्त ट्वीट करणा-याचा शोध लागला आहे.

फेक अकाऊंट ऑपरेट करणारा ‘तो’ कोण?

फेक अकाऊंटवरुन ते ट्वीट कोणी केले होते याचा शोध आम्ही घेतला आहे, अशी माहिती बोम्मई यांनी शिंदे यांना रविवारी मोबाईलवरुन चर्चा करताना दिली. तसेच, फेक अकाऊंट ऑपरेट करणारा एका राष्ट्रीय पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि त्याने मुद्दाम बदनामीच्या हेतून तसे केले, असेही बोम्मई यांनी स्पष्ट केल्याचे समजते.

Another national party worker is behind Bommai’s controversial tweet

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात