वृत्तसंस्था
नवी दिल्ली : मत्स्यव्यवसाय विभाग, मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाने प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना (पीएमएमएसवाय) अंतर्गत 2024-25 पर्यंत मत्स्यपालन आणि जलचर क्षेत्रात सुमारे 55 लाख कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचा विचार केला आहे. 55 lakh employment opportunities in fisheries and aquaculture sector
मत्स्य उत्पादन, उत्पादकता, मत्स्यपालन आणि विविध लक्ष्यित हस्तक्षेपांच्या अंमलबजावणीद्वारे मच्छिमार, मत्स्य उत्पादक, मत्स्य कामगार, मासे विक्रेते, उद्योजक यांच्यासाठी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण करणे आणि मच्छीमार आणि इतर भागधारकांचे उत्पन्न वाढवणे आणि विपणनाच्या पायाभूत सुविधा निर्माण करणे, या योजनेचे उद्दिष्ट आहे. केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री परषोत्तम रुपाला यांनी ही माहिती राज्यसभेत एका लेखी उत्तरात दिली.
कापसाची पुरेशी उपलब्धता : केंद्र सरकार
देशात कापसाचे उत्पादन अंदाजे 341.91 लाख गाठी आहे आणि अंदाजे वापर 311 लाख गाठी आहे. त्यामुळे देशात कापसाची पुरेशी उपलब्धता आहे, अशी माहिती केंद्रीय वस्त्रोद्योग राज्यमंत्री दर्शना जरदोश यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली. शेतीपासून फॅशनपर्यंत सर्वांगीण नियोजनाद्वारे अत्याधुनिक तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देऊन कापसाची उत्पादकता वाढवण्यासाठी वस्त्रोद्योग मंत्रालय कृषी विभागासह सर्व हितसंबंधितांसोबत सतत कार्यरत आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App