विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पाकिस्तानचा परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो पिसाटून बोलला आहे, ओसामा बिन लादेन मेला, पण गुजरातचा कसाई जिवंत आहे. सध्या तो भारताचा पंतप्रधान आहे!!, असे उद्गार बिलावल भुट्टोने काढले. या उद्गारांविरुद्ध देशभर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर संतप्त प्रतिक्रिया उमटल्यला आहेत. Hate India and hindu politics; old habit of Bhutto dynasty of Pakistan
कोणत्याही देशाच्या परराष्ट्र मंत्र्याने अधिकृत पदावर असताना एखाद्या राजकीय पक्षाच्या प्रचारात आक्रस्ताळे भाषण केल्यासारखी भाषा वापरावी हे आंतरराष्ट्रीय पातळीवर अजिबात शिष्टसंमत नाही. बिलावल भुट्टोने पाकिस्तान मध्ये नव्हे, तर न्यूयॉर्कमध्ये मोदींविषयी गुजरातचा कसाई हे उद्गार काढले आहेत.
या उद्गारांमागची कहाणी अशी :
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा समितीची बैठक संयुक्त राष्ट्र संघात झाली. पाकिस्तान या सुरक्षा समितीचा सदस्य आहे. भारताच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत बिलावल भुट्टोने पाकिस्तानचा परराष्ट्रमंत्री या नात्याने भाग घेतला. त्यावेळी त्याने भारताला दहशतवाद रोखण्यासंबंधी उपदेश केला. या उपदेशाला प्रत्युत्तर देताना परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी दहशतवाद पोसणाऱ्या आणि ओसामा बिन लादेनला आश्रय देणाऱ्या देशाने भारताला दहशतवाद रोखण्याचा उपदेश करू नये, असे उद्गार काढले. या उद्गारांमुळे बिलावल भुट्टो चावताळला आणि त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख पत्रकार परिषदेत गुजरातचा कसाई असा केला. एवढेच उद्गार काढून तो थांबला असे नाही, तर भारतात महात्मा गांधींच्या विचारांचे सरकार नाही. ते आरएसएसच्या विचारांचे सरकार आहे. आरएसएसने हिटलर पासून प्रेरणा घेतली. त्या विचारसरणीचा पंतप्रधान भारतावर राज्य करतो आहे. हाच तो पंतप्रधान आहे, ज्याला अमेरिकेने तो गुजरातचा मुख्यमंत्री असताना व्हिसा नाकारला होता, अशी एकापाठोपाठ एक मुक्ताफळेही बिलावल भुट्टोने उधळली आहेत. याचे संतप्त पडसाद आंतरराष्ट्रीय पातळीवर उमटले आहेत.
भारत द्वेषाची खानदानी सवय
पण असे भारत आणि हिंदुद्वेषी पिसाटलेले उद्गार काढायची सवयी एकट्या बिलावल भुट्टोलाच आहे, असे नाही तर ही भुट्टो खानदानाची जुनी सवय आहे. अगदी फाळणीपूर्व काळापासूनची सवय आहे. बिलावल भुट्टोचे पणजोबा शहानवाज भुट्टो हे गुजरात मधल्या जुनागड संस्थानचे दिवाण होते. तिथल्या नबाबाने हिंदू जनतेच्या इच्छेविरोधात पाकिस्तानात सामील व्हायचा निर्णय घेण्याला हे शहानवाज भुट्टोच कारणीभूत होते. पण हिंदू जनतेच्या उठावापुढे त्यांची काही चालले नाही आणि शेवटी त्यांना भारत सरकारला स्वतःच्या सहीचे पत्र लिहावे लागले की जुनागडचा नबाब पाकिस्तानला निघून गेला आहे. जुनागडचा कारभार भारत सरकारने हाती घ्यावा!!
या शहानवाज भुट्टोंचे तिसरे पुत्र झुल्फिकार अली भुट्टो हे पाकिस्तानचे पंतप्रधान बनले. 1971 च्या युद्धात पाकिस्तानने सपाटून मार खाल्ल्यानंतर इंदिरा गांधींशी वाटाघाटी करायला हेच पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो शिमल्यात आले होते. पण त्यापूर्वी झुल्फिकार अली भुट्टो हे पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष आणि नंतर पंतप्रधान असताना अशीच आक्रस्ताळी भाषा वापरून त्यांनी स्वतंत्र बांगलादेश निर्मितीला राजकीय चिथावणी दिली होती. वंगबंधू शेख मुजिबूर रहमान पाकिस्तानी पार्लमेंटची निवडणूक जिंकल्यानंतर देखील त्यांना भुट्टोंनी सत्तांतर करण्यास नकार दिला होता आणि त्यावेळी त्यांनी “उधर तुम, इधर हम” (म्हणजे पूर्व पाकिस्तानात तुम्ही पश्चिम पाकिस्तानात आम्ही), असे उद्गार काढून स्वतंत्र बांगलादेश चळवळीला चिथावणी दिली होती.
इतकेच नाही तर याच झुल्फिकार अली भुट्टोंनी पूर्व पाकिस्तानची आणि सध्याच्या बांगलादेशची राजधानी ढाक्यात जाऊन जाहीर सभेत बंगाल्यांना उद्देशून जहन्नम में जाओ, असे उद्गार काढले होते. त्यामुळे बंगाली जनतेत त्यांच्याविरुद्ध प्रचंड संताप उसळला होता. भुट्टोंनीच आम्ही पाकिस्तानी लोक गवत खाऊ पण अणुबॉम्ब बनवू, अशी धमकी भारताला दिली होती. पण त्यानंतर 1971 च्या युद्धात पाकिस्तानचा दारुण पराभव झाला होता. आजच्याच दिवशी 16 डिसेंबर 1971 रोजी पाकिस्तानची 94000 फौज भारताला ढाक्यात शरण आली होती.
बिलावल भुट्टो हे पाकिस्तानचे तुकडे पडायला कारणीभूत झालेल्या झुल्फिकार अली भुट्टो यांचे नातू आहेत. त्यांची कन्या माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांचे पुत्र आहेत. बिलावलचे वडील आसिफ अली सरदार हे पाकिस्तानात मिस्टर 10% म्हणून ओळखले जातात. पाकिस्तान भुट्टो यांनी स्थापन केलेल्या पीपल्स पार्टीची सत्ता असताना तिथल्या प्रत्येक कामाच्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये असीफ अली झरदारी हे 10 % कमिशन घ्यायचे. त्यामुळेच त्यांना मिस्टर 10% म्हणून ओळखले जाते. आज त्यांचेच पुत्र बिलावल भुट्टो हे शहाबाज शरीफ यांच्या मंत्रिमंडळात परराष्ट्र मंत्री आहेत आणि त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख गुजरातचा कसाई असा केला आहे. याचा आंतरराष्ट्रीय पातळीवरून निषेध होतो आहे त्यामुळे बिलावल भुट्टोची राजकीय कारकीर्द धोक्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App