#BoycottPathaan ट्रेंडच्या धास्तीत कोलकता फिल्म फेस्टिवल मध्ये ममतांचा आधार; शाहरुखला दिसली सोशल मीडियात निगेटिव्हिटी

वृत्तसंस्था

कोलकाता : संपूर्ण देशभर #BoycottPathaan ट्रेंड सुरू असताना शाहरुख खानला मात्र कोलकाता फिल्म फेस्टिवलच्या निमित्ताने ममता बॅनर्जींचा आधार मिळाला आहे. #BoycottPathaan ट्रेनमध्ये शाहरुखला सोशल मीडियातली निगेटिव्हिटी दिसली आहे. Mamata’s support at Kolkata Film Festival in fear of BoycottPathaan trend

शाहरुख खानचा पठाण सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. परंतु, त्या आधीच त्या सिनेमावर अनेकांनी वेगवेगळे आक्षेप घेतले आहेत. यात दीपिका पदुकोणच्या भगव्या बिकिनी पासून ते लव्ह जिहाद पर्यंत अनेक आरोप या सिनेमावर करण्यात आले आहेत.
पण प्रामुख्याने बॉलीवूडच्या खान मंडळींवर सोशल मीडियात सध्या जोरदार विरोध दर्शविण्यात येत आहे. पठाण सिनेमावर बंदीची मागणीही अनेकांनी केली आहे.


सोशल मीडियावर BoycottPathan ट्रेंडचा शाहरुख खानला फटका


लालसिंग चढ्ढा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाल्यानंतर आमिर खानने आपले ऑफिस बदलताना हिंदू बनून कलश पूजा केली. पण तरी देखील तो ट्रोल झाला. आता देखील शाहरुख खानने पठाण रिलीज होण्यापूर्वी वैष्णोदेवीचे दर्शन घेतले पण तो देखील ट्रोल झाला. कारण वर्षानुवर्षे त्यांनी बॉलीवूड मधून छुपा लव्ह जिहादच पसरवला होता. याचा राग सोशल मीडियावर अनेक जण व्यक्त करत आहेत.

या पार्श्वभूमीवर शाहरुखला कोलकत्ता फिल्म फेस्टिवलचा आधार मिळाला आहे. कोलकत्ता फिल्म फेस्टिवलचे उद्घाटन पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केले आहे आणि यात भाषण करताना शाहरुख खानने सोशल मीडिया समाजामध्ये निगेटिव्हिटी आणि द्वेष पसरवतो पण सिनेमा या निगेटिव्हिटीला चांगले प्रत्युत्तर देतो, असा दावा केला आहे.

या आधी शाहरुख खानला सोशल मीडियातील निगेटिव्हिटी कधी दिसली नव्हती. पण त्याच्या पठाण सिनेमावर बहिष्काराचा ट्रेंड सुरू होताच त्याला ही निगेटिव्हिटी दिसली आहे आणि कोलकत्ता फिल्म फेस्टिवल मध्ये ममता बॅनर्जींचा राजकीय आधार मिळताच त्याच फिल्म फेस्टिवल मध्ये त्याने सोशल मीडियातल्या निगेटिव्हिटी वर भाष्य केले आहे.

Mamata’s support at Kolkata Film Festival in fear of BoycottPathaan trend

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात