चिनी लष्कर गुंड मवाल्यांसारखे, नेहमी भारतीयांचा मार खाते; जनरल नरवणेंकडून कडक शब्दात संभावना

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : चीनची पीपल्स लिबरेशन आर्मी म्हणजे चिनी लष्कर गुंड मवाल्यांसारखे वागत असून त्यांची भारत भूमी बळकवण्याची रणनीती फार जुनी आहे. पण भारत आता आपल्या प्रोफेशनल लष्करासह चिनी गुंड मवाल्यांचा बिमोड करत आहे, अशा कडक शब्दात माजी लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी चिनी घुसखोरीचा समाचार घेतला आहे. एएनआय वृत्तसंस्थेला दिलेल्या खास पोडकास्ट मध्ये जनरल नरवणे यांनी चीन आणि पाकिस्तान संदर्भात विचारलेल्या सर्व प्रश्नांना सविस्तर उत्तरे दिली. The Chinese army is behaving like gangsters



चीनची चीनचे लष्कर म्हणजे कम्युनिस्ट पार्टीची पब्लिक पीपल्स लिबरेशन आर्मी आहे. 21व्या शतकातही ते लाठ्या लोखंडी शिगा यांनीच मारामारी करतात. पण ते दरवर्षी भारतात घुसखुरी करण्याचा प्रयत्न करतात आणि भारतीय लष्कर त्यांना मार देते. चिनी लष्कराचे एक धोरण आहे, ते घुसखोरीचे सतत प्रयत्न करतात आणि एकदा बळकावलेली जमीन न सोडता ते पुढे येण्याचा प्रयत्न करतात. हे त्यांनी वर्षानुवर्षे केले. सुरुवातीला त्यांना प्रतिकार झाला नाही. पण आता मात्र भारतीय लष्कर चिनी घुसखोरांचा नुसता प्रतिकार करते असे नाही तर त्यांना वारंवार मार देऊन परत पाठवत असते, असे जनरल नरवणे यांनी स्पष्ट केले.

एकीकडे भारतीय लष्कर स्वतःचे अत्याधुनिकीकरण करत असताना दुसरीकडे चिनी लष्कराची वर्तणूक मात्र गुंड मवाल्यांसारखीच असते. पण त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिल्यानंतर ते नरमतात, असा अनुभव देखील जनरल नरवणे यांनी सांगितला. गलवान पासून तवांग मधील यांगत्से पर्यंत सगळीकडे चिनी घुसखोरांनी रस्त्यावरच्या गुंड मवाल्यांसारखाच लाठ्या काठ्या आणि लोखंडी शिगांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना भारतीय लष्कराने हाकलून लावल्याने चीनची जगात नाचक्की झाली आहे, असे जनरल नरवणे म्हणाले.

The Chinese army is behaving like gangsters

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात