राजीव गांधी फाऊंडेशनला चीनकडून 1.35 कोटींची देणगी; भारतीय कायद्याच्या उल्लंघनामुळे फाउंडेशनचे लायसन्स रद्द; अमित शाहांची माहिती

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : राजीव गांधी फाउंडेशनला चीनकडून 1.35 कोटी रुपयांची देणगी मिळाल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिली आहे. या संदर्भात संसदेत प्रश्नकाल सूचीमध्ये पाचव्या क्रमांकाचा प्रश्न आला होता. परंतु, तवांगमध्ये चिनी सैनिकांनी केलेल्या घुसखोरी संदर्भात मुद्दा उपस्थित करून विरोधकांनी संशोधित गोंधळ घातला. त्यामुळे संबंधित प्रश्नकाल झालाच नाही.  1.35 crore grant from China to Rajiv Gandhi Foundation

या संदर्भात बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले, चिनी अतिक्रमणाबाबतची काँग्रेसची चिंता मला लक्षात आली. आज प्रश्नकाल सूची मधल्या पाचवा प्रश्न राजीव गांधी फाउंडेशनला मिळालेल्या देणग्यांसंदर्भात होता. त्यात विदेशी योगदान विनिमय अधिनियमाचे उल्लंघन झाले आहे. कायद्यानुसार फाउंडेशनचे लायसन्स रद्द केले आहे. या संदर्भात प्रश्न विचारला होता. पण काँग्रेसने नेमका त्याच वेळी गोंधळ घातला. जर संसदेत मला या प्रश्नाचे उत्तर देण्याची संधी मिळाली असती तर मी संसदेतच त्याचे उत्तर दिले असते.

राजीव गांधी फाउंडेशनला चीनने यूपीए सरकार असताना 2005 – 2007 या कालावधीत 1.35 कोटी रुपयांची देणगी दिली आहे. विदेशी योगदान विनिमय अधिनियमाचे यात उल्लंघन झाले आहे. त्यामुळे केंद्रीय गृहमंत्रालयाने कायद्याचे पालन करत राजीव गांधी फाउंडेशनचे लायसन्स रद्द केले आहे. हे उत्तर मी संसदेत देऊ शकलो असतो. पण संसदेत या संदर्भातला प्रश्नकाल सूचीत असूनही तो विचारला नाही. त्यामुळे मी हे उत्तर संसदेत देऊ शकलो नाही, असा खुलासा अमित शाह यांनी केला आहे.

1.35 crore grant from China to Rajiv Gandhi Foundation

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात