वृत्तसंस्था
नवी दिल्ली / वसई : श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणाचा तपास करणारे दिल्ली पोलीस वसईत दाखल झाले आहेत. वसईमध्ये दिल्ली पोलिसांनी आफताब आणि श्रद्धा यांचे शेजारी, मित्रपरिवाराची चौकशी केली आहे. तसेच, डेटिंग ॲपवर आफताबला भेटलेल्या 3 तरुणींची चौकशी दिल्ली पोलिसांनी केली. वसईतील माणिकपूर पोलीस ठाण्यात मंगळवारी ही चौकशी करण्यात आली. Interrogation of 3 young women who dated Aftab by Delhi Police at Vasai police station
दिल्ली आणि वसई पोलिसांनी या चौकशीबाबत कोणतीही माहिती उघड केली नाही. आफताब पूनावाला डेट करत असलेल्या 4 पैकी 2 तरुणींचा वसई पोलीसांकडून शोध सुरू आहे. तसेच, मंगळवारी चौकशी करण्यात आलेल्या तरुणी या हत्येच्या आधी आणि नंतरही आफताबच्या संपर्कात होत्या. त्याशिवाय त्यांच्यात फोनवर संभाषणदेखील झाले असल्याची चर्चा आहे.
आफताबची नार्को टेस्ट केली जाणार
पोलिसांनी श्रद्धाचे मित्र- मैत्रिणी, कार्यालयातले सहकारी, नातेवाईक असे अंदाजे 20 हून अधिक लोकांचे जबाब घेतले आहेत. बहुतेक जणांनी त्यांच्या श्रद्धाशी केलेले चॅट किंवा काॅलबाबतची माहिती आणि पुरावे पोलिसांना दिले आहेत. तर, दुसरीकडे पोलिसांकडून आफताबची नार्को चाचणी करण्यात येणार आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App