लालूप्रसादांना किडनी दान करणार त्यांची कन्या रोहिणी आचार्य

वृत्तसंस्था

सिंगापूर : बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव सध्या किडनीसह विविध आजारांनी ग्रस्त आहेत. डॉक्टरांनी त्यांना किडनी ट्रान्सप्लांट करण्याचा सल्ला दिला आहे. या सल्ल्यानंतर त्यांची कन्या रोहिणी आचार्य ही आपली किडनी आपल्या पित्यासाठी लालूप्रसाद यादव यांच्यासाठी दान करायला पुढे आली आहे. His daughter Rohini Acharya will donate a kidney to Lalu Prasad

रोहिणी आचार्य आपल्या पतीसह सिंगापूर मध्ये राहते. लालूप्रसाद यादव ऑक्टोबर 2022 मध्ये सिंगापूर मध्ये जाऊन आपल्या वैद्यकीय चाचण्या करून आले. त्यावेळी त्यांची सगळी देखभाल रोहिणी हिने स्वतः केली होती. डॉक्टरांनी त्यांना किडनी ट्रान्सप्लांट करण्याचा सल्ला दिला. त्यावेळी रोहिणी आचार्य हिने आपली किडनी दान करण्याची तयारी दर्शवली.



राष्ट्रीय जनता दलाचे अनेक कार्यकर्ते देखील स्वतःची किडनी दान करायला पुढे आले होते. परंतु लालूप्रसादांनी तो निर्णय तेव्हा मान्य केला नव्हता. आता सर्व कुटुंबीयांनी मिळून त्यांना आग्रह केल्यानंतर ते आपली कन्या रोहिणीची किडनी स्वीकारण्यासाठी तयार झाले आहेत.

येत्या 20 ते 24 नोव्हेंबर दरम्यान लालूप्रसाद यादव सिंगापूरला जातील आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांचे किडनी ट्रान्सप्लांट होईल, असे समजते.

His daughter Rohini Acharya will donate a kidney to Lalu Prasad

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात