वृत्तसंस्था
शिमला : भारताची लोकशाही ज्या सर्वात महत्त्वाच्या घटकावर आधारित आहे, त्या सर्वसामान्य मतदाराप्रती निवडणूक आयोग किती सजग आहे याचे उत्तम उदाहरण आज दिसले आहे. स्वतंत्र भारतातले पहिल्या मतदाराला निवडणूक आयोगाने विशेष मानवंदना दिली आहे.Congratulations to the first voter in the country; Chief Election Commissioner Rajiv Kumar attends the funeral of Shyam Saran Negi
स्वतंत्र भारतातल्या पहिल्या निवडणुकीचे पहिले मतदार श्याम सरण नेगी की यांचे हिमाचल प्रदेशातील काल्पा येथे त्यांच्या वयाच्या 106 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावरील अंत्यसंस्कारासाठी भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार हे काल्पा येथे पोहोचले आहेत.
श्याम सरण नेगी यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी जाहीर केले, पण हिमाचल प्रदेशात सध्या विधानसभा निवडणूक सुरू आहे. तेथे निवडणूक आचारसंहिता लागू आहे. त्यामुळे राजकीय पक्षांच्या नेत्यांना मर्यादा आली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार हे सरकारचे प्रतिनिधी या नात्याने अंत्यसंस्कारांना उपस्थित राहिले आहेत.
श्याम सरण नेगी यांनी लोकसभेच्या पहिल्या म्हणजे 1952 च्या निवडणुकीपासून आत्तापर्यंत हिमाचल प्रदेशात सध्या सुरू असलेल्या विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत म्हणजे तब्बल 33 निवडणुकांमध्ये आपल्या मतदानाचे पवित्र कर्तव्य बजावले होते. एकाही निवडणुकीत त्यांचे मतदान चुकले नव्हते. अशा श्याम सरण नेगी यांच्या अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहून मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App