प्रतिनिधी
मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार हे ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांना निमोनिया झाल्याने त्यांच्यावर मागील ४ दिवसांपासून डॉक्टर उपचार करत आहेत. त्यांच्या तब्येतेची विचारपूस करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ब्रीच कँडी येथे गेले. Sharad Pawar today from Breach Candy to Shirdi to NCP’s thinking camp
राष्ट्रवादीच्या शिबिरात प्रत्यक्ष सहभागी होणार
विशेष म्हणजे शिंदे पवारांच्या भेटीसाठी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल झालेले असताना तिकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे देखील त्यांच्या मातोश्री निवासस्थानावरुन निघाल्याची माहिती समोर आली. त्यामुळे अधिक आश्चर्य व्यक्त होत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शरद पवारांची ब्रीच कँडी रुग्णालयात भेट घेतली. मुख्यमंत्री रुग्णालयात 10 मिनिटे थांबले होते. त्यांनी पवारांच्या तब्येतीची विचारपूस केली. त्यानंतर ते पवारांचा निरोप घेऊन रुग्णालयाबाहेर आले. यावेळी त्यांनी प्रतिक्रिया दिली. “शरद पवारांच्या प्रकृतीची मी विचारपूस केली. त्यांच्याशी मी बोललो. त्यांची तब्येत चांगली आहे. निमोनिया देखील रिकव्हर झाला आहे.
माझ्याशी खूप चांगले बोलले. त्यांची तब्येत उत्तम आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शनिवार, ५ ऑक्टोबर रोजी शिबीर आहे. त्यामध्ये शरद पवार सहभागी होणार आहेत. त्यानंतर ते पुन्हा रुग्णालयात दाखल होणार असल्याची माहिती शरद पवारांनी दिली, असे देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App