प्रतिनिधी
मुंबई : शाहरुख खानच्या वाढदिवशी पठाण सिनेमाचा टीझर रिलीज केला खरा, पण आता त्याला बहिष्काराचा सामना करावा लागत आहे. पठाण चित्रपट सुरूवातीपासूनच चर्चेत आहे. सलमान खान, अमीर खान यांना बहिष्काराचा सामना करावा लागल्यानंतर आता शाहरुख खान याची वेळ आली आहे. तब्बल तीन वर्षांनंतर शाहरुख खान हा मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. पण आता #BoycottPathan हा ट्रेंड सुरू झाला आहे. संघर्ष निरंतर जारी है अब पठाण कि बारी है असे सांगत BoycottPathan असा ट्रेंड ट्विटरवर सुरू आहे. Shah Rukh Khan hit by BoycottPathan trend on social media
टीझर रिलीज झाल्यापासून टीका
ज्या दिवशीपासून पठाण सिनेमाचा टीझर रिलीज झाला, त्याच दिवसापासून सोशल मीडियावर ‘#BoycottPathaan’ हा ट्रेंड सुरू आहे. आता याचा फटका चित्रपटाला बसू शकतो. पठाणचा टीझर रिलीज झाल्यापासून अभिनेता शाहरुख खानला ट्रोल होतो आहे. पठाण चित्रपट हा हाॅलिवूड चित्रपटांची कॉपी असल्याचे युजर्सचे म्हणणे आहे आणि या चित्रपटात काही वेगळे नसल्याचे देखील युजर्स म्हणत आहेत.
२५ जानेवारी २०२३ रिलीज डेट
या सिनेमात शाहरुख खानसोबत दीपिका पादुकोण मुख्य भूमिकेत आहे. शाहरुख खानच्या वाढदिवसाच्या दिवशी पठाण चित्रपटाच्या सेटवरील एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्या फोटोमध्ये दीपिका पादुकोण आणि शाहरुख खान होते. पठाण हा सिनेमा 25 जानेवारी 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे, मात्र आतापासूनच सिनेमावर बहिष्काराची मागणी जोर धरू लागली आहे. जॉन अब्राहम देखील या चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत आहे. गेल्या काही दिवसांपासून बाॅलिवूडच्या काही सिनेमांवर प्रेक्षक बहिष्कार घालत आहेत. याचा परिणाम बाॅक्स ऑफिस कलेक्शनवर झाला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App