प्रतिनिधी
मुंबई : भारतीय नौसेनेत 180 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू होत आहे. त्यासाठीची अधिसूचना आता जारी करण्यात आली आहे. यातील काही पदांसाठी 10 वी पास किंवा आयटीआयचे शिक्षण घेणे आवश्यक आहे. dIndian Navy direct recruitment, 10th pass students can also apply
विविध विभागांमध्ये शिकाऊ उमेदवार या पदांसाठी ही भरती प्रक्रिया असणार आहे. ITI Apprentice in Naval ship repair yard,naval base या पदासाठी ही भरती असणार आहे. एकूण 180 जागांवर ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. संबंधित पदानुसार इच्छुक उमेदवारांकडे 10 वी पास किंवा आयटीआय पर्यंतचे शिक्षण असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवारांना संबंधित पदाचा पुरेसा अनुभव असणे देखील आवश्यक आहे. पात्र उमेदवारांना नौसेनेच्या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.
तसेच काही पदांसाठी पदवीपर्यंतचे शिक्षण ही शैक्षणिक पात्रता पूर्ण करणे गरजेचे आहे. त्यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण पूर्ण करणे आवश्यक असणार आहे. याबाबतची अधिक माहिती नौसेनेच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
या पदांसाठी भरती प्रक्रिया
सुतार, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, फिटर, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, मशिनिस्ट मेकॅनिक, डिझेल मेकॅनिक, मोटार वाहन मेकॅनिक यांसारख्या 180 जागांसाठी भरती होणार आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App