वृत्तसंस्था
सॅन फ्रान्सिस्को : टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांनी नुकताच ट्विटरचा ताबा घेतला आहे. यानंतर त्यांनी कंपनीचे सीईओ पराग अग्रवाल यांच्यासह अनेक उच्चपदस्थांना कंपनीच्या बाहेरचा रस्ता दाखवला आहे. राॅयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, ट्वीटरचे सीईओ पराग अग्रवाल, विजया गड्डे, मुख्य वित्तीय अधिकारी नेड सेहगल आणि इतर काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. नेड सेहगल आणि पराग अग्रवाल हे दोघेही सॅन फ्रान्सिस्कोच्या मुख्यालयात उपस्थित होते. त्यावेळी त्यांना ट्वीटरमधून बाहेर काढण्याचा निर्णय घेण्यात आला. Elon Musk takes over Twitter; Top bosses way out
Elon Musk Twitter : एलन मस्क यांची ट्विटरला ४३ अब्ज डॉलरमध्ये खरेदी करण्याची ऑफर, ट्विटरच्या शेअर्समध्ये झपाट्याने वाढ
मस्क यांचे ट्विट
गुरुवारी एलाॅन मस्क यांनी ट्विट करत ट्विटर विकत घेण्याच्या उद्देशाबाबत माहिती दिली होती. भविष्यातील नागरिकांसाठी एक डिजिटल मंच असणे आवश्यक आहे. त्यामुळेच मी ट्विटर खरेदी केले आहे. या ठिकाणी विविध विचारसरणीचे लोक हिंसा टाळून वादविवाद करू शकतील. सध्या समाजमाध्यमे अतिउजवे आणि अतिडावे यात विभागली जाण्याची भीती आहे. त्यामुळे तिरस्कार आणि समाजातील दरी वाढत जाईल, अशा आशयाचे ट्विट मस्क यांनी केले होते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App