समर्थ रामदास स्वामींच्या देवघरातील मूर्ती चोरणाऱ्या दोघांना अटक; पोलिस मुख्य आरोपीच्या मागावर

प्रतिनिधी

जालना : जालना जिल्ह्यातील जांब समर्थ येथील समर्थांच्या देवघरातील मूर्तीचोरी प्रकरणात पोलिसांना मोठे यश आले असून पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. आता पोलीस मुख्य आरोपीच्या मागावर आहेत. पोलिसांनी अटक केलेल्या दोन आरोपींकडून समर्थांच्या हनुमानाच्या मूर्ती जप्त केल्या आहेत. जालनामधील समर्थ रामदास स्वामींच्या जन्मगावी ‘जांब समर्थ’ येथील राम मंदिरातून ऐतिहासिक मूर्ती ऑगस्ट महिन्यात चोरीला गेल्या होत्या. Two arrested for stealing idols from Samarth Ramdas Swamy’s Deoghara

मंदिरातून 450 वर्षापूर्वीच्या ऐतिहासिक मूर्ती चोरीला गेल्याने एकच खळबळ माजली होती. याच प्रकरणात पोलिसांना मोठे यश आले आहे. दोघांना कर्नाटक आणि सोलापूरमधून दोघांना अटक केली आहे. या प्रकरणातील आणखी एक आरोपी फरार आहे. धक्कादायक बाब म्हणजे चोरांनी या ऐतिहासिक मूर्ती काही हजार रुपयांना विकल्या होत्या. या घटनेचा तपास स्पेशल इन्वेस्टीगेशन टीम अर्थात SIT च्या मार्फत सुरू आहे. पोलीस महसंचालकांच्या सुचनेवरुन या एसआयटीची स्थापना करण्यात आली होती. या चोरीच्या घटनेच्या सखोल तपासासाठी तामिळनाडू पोलिसांच्या एक्स्पर्ट आयडॉल विंगची मदत घेतली जाणार आहे.

25 हजारांना विकल्या ऐतिहासिक मूर्ती

चोरीला गेलेल्या ऐतिहासिक मूर्तींपैकी काही मूर्ती पोलिसांनी आरोपींकडून जप्त केल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे चोरांनी या ऐतिहासिक मूर्ती 25 हजारात विकल्या होत्या. ऑगस्ट महिन्यात मूर्ती चोरी प्रकरणाचे पडसाद विधानसभेतही पाहायला मिळाले होते. 22 ऑगस्ट रोजी चोरी गेलेल्या राम मूर्तीचा तपास आधी जालना स्थानिक गुन्हे शाखेकडे होता. त्यानंतर या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे वर्ग करण्यात आला. दोघांना अटक केल्यानंतर पोलीस आता मुख्य आरोपीच्या मागावर आहेत.

Two arrested for stealing idols from Samarth Ramdas Swamy’s Deoghara

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात