भारतातील दहशतवादी कारवायांमध्ये 37 % घट; गृहमंत्री अमित शहांनी दिली माहिती

वृत्तसंस्था

सुरजकुंड : देशभरात दहशतवादी घटनांमध्ये 37 % घट झाली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वात सर्व राज्यांतील गृहमंत्र्यांच्या दोन दिवसीय चिंतन शिबिराला सुरुवात झाली आहे. या शिबिरात दहशतवादाबाबत माहिती देताना गृहमंत्री अमित शहा यांनी गेल्या 37 महिन्यांत देशातील दहशतवादी घटनांमध्ये 34 % टक्के घट झाल्याची माहिती देली आहे. तसेच या दहशतवादी हल्ल्यात सुरक्षा दलांच्या जवानांच्या मृत्यूत 64 % आणि नागरिकांच्या मृत्यूत 90 % घट झाल्याचेही अमित शाह यांनी या वेळी सांगितले. 37% reduction in terrorist activities in India



2014 नंतर दहशतवादी घटनांमध्ये 74 % टक्क्यांची घट झाली आहे. तसेच नागरिकांच्या मृत्यूंच्या संख्येत 90 % घट झाली आहे. हे फार मोठे यश आहे. इतक्या कमी वेळेत नागरिकांच्या मृत्यूंमध्ये झालेली ही घट समानधारक आहे. तसेच गेल्या 37 महिन्यांत देशातील दहशतवादी घटनांमध्ये 34 % घट झाल्याची माहिती दिली आहे.

एनआयएच्या प्रत्येक राज्यात शाखा

केंद्रीय तपास यंत्रणा असलेल्या एनआयएच्या प्रत्येक राज्यात शाखा स्थापन करणार असल्याची घोषणाही गृहमंत्री अमित शहा यांनी यावेळी केली आहे. एनआयएला व्यक्तिगत आतंकवादी घोषित करण्यासाठी यूएपीए अंतर्गत नुकतेच अधिकार देण्यात आले आहेत. नुकतीच एआयएने पीएफआय या संघटनेवर बंदी घातली आहे. तसेच आतंकवादी संघटनेशी संबंधित जमिनींवर कारवाई करण्याचे अधिकारही एनआयएला देण्यात आले आहेत. त्यामुळे 2024 पर्यंत एनआयएच्या प्रत्येक राज्यात शाखा स्थापन करण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला असल्याचे अमित शाह यांनी सांगितले.

37% reduction in terrorist activities in India

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात