ऋषी सुनक यांची निवड आणि चिदंबरम यांची भारतीयांना शिकवणी; सुप्त हेतू काय??

विशेष प्रतिनिधी

दिल्ली : भारतावर 150 वर्षांची गुलामगिरी लादणाऱ्या ब्रिटनवर भारतीय वंशाचे कृषी सुनक पंतप्रधानपदी बसून राज्य करणार आहेत. इतिहासाने घेतलेले हे अपरिहार्य वळण आहे. ब्रिटिशांनी वर्णवर्चस्व वादातून भारतीयांवर राज्य केले. गोरे राज्यकर्ते आणि काळे गुलाम असा भेद केला. पण आता गोऱ्यांच्या ब्रिटनमध्ये काळे ऋषी सुनक त्यांचे सर्वोच्च नेते म्हणजे पंतप्रधान बनणार आहेत. The people of the U.S. and the U.K have embraced the non-majority citizens of their countries and elected them

दिवाळीच्या लक्ष्मीपूजनादिवशी भारतात ही बातमी आल्यामुळे खरंच चैतन्य पसरले यात शंका नाही. पण ऋषी सुनक पंतप्रधान बनण्याच्या निमित्ताने काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी भारतीयांची जी शिकवणी घेतली आहे, तिचा समाचार घेणे भाग आहे. चिदंबरम यांनी ट्विट करून भारतीयांची शिकवणी घेतली आहे. आधी कमला हॅरीस आणि आता ऋषी सुनक या बहुसंख्यांक नसलेल्या दोन नेत्यांना अमेरिका आणि ब्रिटन यांच्यासारख्या लोकशाहीवादी देशांमध्ये नेतेपदी निवडले आहे. यातून भारतीयांनी धडा शिकण्याची गरज आहे. विशेषतः भारतामध्ये जे पक्ष बहुसंख्यांकवाद जोपासतात त्यांनी धडा शिकण्याची गरज आहे, असे चिदंबरम यांनी म्हटले आहे.

हा अर्थातच सत्ताधारी भाजपला टोला आहे. पण चिदंबरम यांचे ट्विट फक्त भाजपला टोला देण्यापुरतेच मर्यादित आहे का??… की त्यामागे अन्य काही सुप्त हेतू आहे??, याचा नीट बारकाईने विचार केला, तर त्या मागचा सुप्त हेतू लक्षात येतो, तो म्हणजे काँग्रेसच्या निवर्तमान अध्यक्ष सोनिया गांधी यांना काँग्रेस अंतर्गत आणि काँग्रेस बाह्य परकीयत्वाचा मुद्दा जो सहन करावा लागला आणि त्यामुळे त्यांचे पंतप्रधानपद त्यांच्यापासून दुरावले हा विषय ऐरणीवर आणण्याचा चिदंबरम यांचा सुप्त हेतू दिसतो आहे. अमेरिका आणि ब्रिटन यांच्यात जर भारतीय वंशाचे नेते हे उपाध्यक्ष आणि पंतप्रधान बनू शकतात, तर सोनिया गांधी यांच्यासारख्या इटालियन वंशाच्या नेत्या भारताच्या पंतप्रधान का बनू शकत नाहीत??, असा सुप्त प्रश्न चिदंबरम यांच्या ट्विट मधले “बिटवीन द लाईन्स” आहे.

अर्थातच चिदंबरम हे अतिशय उच्चशिक्षित असल्याने त्यांनी सोनिया गांधींची खुशामतखोरी अतिशय उच्चशिक्षित भाषेत केली आहे. त्याला बौद्धिक युक्तिवादाची डूब दिली आहे. पण म्हणून “बिटवीन द लाईन्स” मधला सुप्त हेतू लपत नाही.

ऋषी सुनक यांनी ब्रिटनचे पंतप्रधान बनणे, कमला हॅरीस यांनी अमेरिकेचे उपाध्यक्ष बनणे आणि सोनिया गांधी यांनी भारताचे पंतप्रधान न बनणे यात गुणात्मक फरक आहे, हे चिदंबरम अतिशय चतुराईने विसरलेले दिसत आहेत. त्यांना फक्त सोनिया गांधींचा परकीयत्वाचा मुद्दा कसा गैर लागू आहे, हेच भारतीयांच्या मनावर ठसावयाचे आहे किंबहुना भारतीयांच्या मनावर तो मुद्दा ठसो अथवा न ठसो आपण सोनिया गांधींचा मुद्दा ऐरणीवर आणला एवढे गांधी परिवाराचे समाधान करून द्यायचे आहे.

– भारतीयांवर बहुसंख्यांकवादाचा आरोप उचित आहे का??

पण त्या पलिकडे जाऊन चिदंबरम यांच्या ट्विट्चा विचार केला, तर जणू काही भारतीयांनी नेहमीच बहुसंख्यांकवाद जोपासला असा जो आरोप केला आहे, त्यामध्ये तरी तथ्य आहे का??, तर वस्तुस्थिती तशी नाही. भारतामध्ये राष्ट्रपतीपदी म्हणजेच सर्वोच्च पदी बहुसंख्यांक नसलेले मुस्लिम नेते बसले आहेत. त्यातले दोन मुस्लिम नेते तर काँग्रेसनेच राष्ट्रपती केले आहेत. ते म्हणजे डॉ. झाकिर हुसेन आणि फक्रुद्दीन अली अहमद, तर तिसरे नेते डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना भाजपने राष्ट्रपती कधी बसवले आहेत. त्यामुळे चिदंबरम यांचा भारतीयांची शिकवणी घेण्याचा प्रयत्न देखील एकतर अपुरा ज्ञानावर आधारित आहे किंवा मुळातच तो खोडसाळपणा आहे.

हे जे काहीही असले तरी चिदंबरम यांचा मूळ सुप्त हेतू सोनिया गांधींच्या परकीयत्वाचा मुद्दा देशाच्या राजकीय पटलावर पुन्हा ऐरणीवर आणणे हा आहे, हा मुद्दा विसरता येणार नाही.

The people of the U.S. and the U.K have embraced the non-majority citizens of their countries and elected them

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात