CAIT estimate : दिवाळीचा हर्ष, होऊ दे खर्च; भारतीय करताहेत तब्बल 2,50,000 कोटी रुपयांचा आनंद

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : कोरोना नंतरची 2022 ची दिवाळी भारतात खरंच आनंदाची लाट घेऊन आली आहे. यंदाच्या दिवाळीचे आनंद उत्साहाचे पर्व भारतीयांसाठी खर्चिक बाब ठरली आहे, तरी आनंदात कुठे उणीव नाही. गेल्या वर्षी भारतीयांनी दिवाळीत 1,25,000 कोटी रुपये खर्च केले होते. Happy Diwali, let it be spent; 2,50,000 crore rupees in Indian

यंदा मात्र दिवाळीत तब्बल 2,50,000 कोटी रुपये भारतीय खर्च करत आहेत. ही आकडेवारी सरकारने नव्हे, तर कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स अर्थात CAIT या संघटनेने जाहीर केली आहे यंदाच्या दिवाळीत भारतीयांच्या खर्चाची पातळी 200000 कोटींचा आकडा ओलांडेल, असा अंदाज संघटनेने व्यक्त केला आहे. 2019 मध्ये भारतीयांनी दिवाळीत 90,000 कोटी रुपये खर्च केले होते.

  • यंदा 2022 च्या दिवाळीत 150000 कोटी रुपयांची नुसती खरेदी होणार आहे, तर वरचे 100000 लाख रुपये हे प्रवास आणि सेवा यावरचा खर्च असणे अपेक्षित आहे.
  • GST उत्पन्न देखील 200000 कोटींचा आकडा ओलांडणे अपेक्षित आहे.
  • एकट्या धनत्रयोदशीच्या दिवशी सोन्या चांदीचा 45000 कोटींचा धंदा झाला.
  • वाहन खरेदी रियल इस्टेट कपडा धान्य इलेक्ट्रॉनिक्स वस्तू फोन्स यांच्या खरेदीची आकडेवारी अजून यायची आहे.
  • लक्ष्मी विक्री शेकडो कोटी रुपयांची झाली आहे.
  • यंदाच्या दिवाळीत व्होकल फार लोकल चा बोलबाला होता. त्यामुळे भारतीयांनी भारतातच बनवलेल्या वस्तू खरेदी केल्या. यामुळे चीनला तब्बल 100000 कोटी रुपयांचा फटका बसला.

Happy Diwali, let it be spent; 2,50,000 crore rupees in Indian

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात