वृत्तसंस्था
बीजिंग : चीनमध्ये राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी हुकूमशाहीचा पंजा घट्ट आवळला असून माझी राष्ट्रपती हो जिंताओ यांची चिनी कम्युनिस्ट पार्टीच्या बैठकीतून अक्षरशः हकालपट्टी करण्यात आली आहे. शी जिनपिंग यांनी आपल्याला प्रतिस्पर्धी ठरू शकणारे पंतप्रधान ली केकिआंग यांनाही काढून टाकले आहे. China is under the grip of the Xi Jinping dictatorship
शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या बैठकीत शी जिनपिंग कझाकस्तानची राजधानी समरकंदमध्ये असताना त्यांच्याविरुद्ध बंड झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. काही बंडखोरांची नावे चीन सोडून इतरत्र माध्यमांमध्ये आली होती. परंतु प्रत्यक्षात शी जिनपिंग यांच्या हुकूमशाहीचा पंजा घट्ट आवळला असून त्यांनीच आपल्या पक्षातल्या अतिवरिष्ठ नेत्यांना चिनी कम्युनिस्ट पार्टीच्या बैठकीतून बाहेर हाकलले आहे.
चीनमध्ये कम्युनिस्ट पार्टीच्या २० व्या परिषदेत विद्यमान राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्या पक्षातील तिसऱ्या कार्यकाळाबद्दल चर्चा सुरू होती आहेत. मात्र, त्याचवेळी त्या परिषदेत मोठे नाट्य घडले. चीनचे माजी राष्ट्रपती हू जिंताओ यांना पार्टीच्या परिषदेतून जबरदस्ती बाहेर काढण्यात आले. हू जिंताओ यांना बाहेर काढण्यात आले, त्यावेळी चीनच्या ग्रेट हॉलमध्ये समारोप कार्यक्रम सुरू होता. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
सुरक्षारक्षक हू जिंताओ यांना जबरदस्ती पकडून परिषदेतून बाहेर काढले. मात्र, हू जिंताओ यांना पार्टीच्या परिषदेतून बाहेर पडायला तयार नव्हते. ते विरोध करत असताना त्यांना जबरदस्तीने ग्रेट हॉलमधून बाहेर काढण्यात आलं.
हू जिंताओ यांचं वय ७९ वर्ष आहे. परिषदेत ते पुढच्या रांगेतील खूर्चीवर बसले होते. त्यांच्यापुढे राष्ट्रपती शी जिनपिंग बसले होते. त्यानंतर हू जिंताओ यांच्याजवळ दोन लोक येतात आणि चर्चा करतात नंतर थोड्याच वेळात त्यांना परिषदेतून बाहेर काढले.
शी जिनपिंग यांचे पक्षातील विरोधक असलेल्या पंतप्रधान ली केकिआंग यांना देखील सेंट्रल कमिटीतून बाहेर काढण्यात आले. पक्षाच्या परिषदेत निर्णय घेत ली केकिआंग यांना कम्युनिस्ट पार्टीच्या सेंट्रल कमिटीतून बाहेर काढण्यात आले आहे.
शी जिनपिंग यांच्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचे नेते ली केकिआंग यांना पक्षाच्या प्रमुख जबाबदारीतून मुक्त कररण्यात आले आहे. ली केकिआंग यांना शी जिनपिंग यांचे प्रतिस्पर्धी होते. मात्र, त्यांना सेंट्रल कमिटीतून बाहेर काढण्यात आल्याने कम्युनिस्ट पार्टीचे प्रमुख होण्याचा शी जिनपिंग यांचा मार्ग मोकळा झाला आहे.
कम्युनिस्ट पक्षाच्या २० व्या परिषदेच्या अगोदर राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्याशिवाय इतर नेतृत्त्वात बदल पाहायला मिळतील अशा चर्चा होत्या.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी शी जिनपिंग नजरकैदेत असल्याच्या चर्चा सुरु होत्या. मात्र, चीनच्या कम्युनिस्ट पार्टीच्या २० व्या परिषदेत त्यांनी प्रतिस्पर्धी नेत्यांना पक्षाच्या सेंट्रल कमिटीतूनचं बाहेरचा रस्ता दाखवला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App