Target Killing : जम्मू – काश्मीरमध्ये दोन मजुरांचे टार्गेट किलिंग; लष्कर ए तैय्यबाचे दोन दहशतवादी ताब्यात

प्रतिनिधी

जम्मू : जम्मू- काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी टार्गेट किलिंगच्या घटना वाढवल्या आहेत. आज मंगळवारी काश्मीरमधील दोन मजुरांवर हल्ला केला. या घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून, दोघेही उत्तर प्रदेशच्या कन्नोज येथील आहे. मनोज कुमार आणि राम सागर अशी मजुरांची नावे आहेत. Target killing of two laborers in Jammu and Kashmir

दहशतवाद्यांनी शोपिया येथील हरमन परिसरात हा हल्ला केला आहे. यामध्ये दोन मजूर गंभीर जखमी झाले, जखमी मजुरांना स्थानिक नागरिकांनी रुग्णालात दाखल केले. रुग्णालयात डाॅक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. एडीजीपी काश्मीर झोनचे विजय कुमार यांनी मीडियाशी बोलताना सांगितले की, लष्कर- ए- तैयबाचे दहशतवादी इमरान बशीर गनी, हरमन यांनी मजुरांवर हल्ला केला होता.

दोन्ही दहशतवादी शोपिया पोलिसांच्या ताब्यात असून पोलीस अधिक तपास करत आहेत. हल्ला झाला त्यावेळी दोन्ही मजूर एका टीन शेडमध्ये झोपले होते. यादरम्यान दहशतवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला.

काश्मीरमधील लोकांमध्ये संताप

काश्मीरमध्ये होणा-या या टार्गेट किलिंगमुळे काश्मीरी पंडितांकडून जम्मूमध्ये जोरदार निदर्शने करण्यात येत आहेत. टार्गेट किलिंग विरोधात काश्मिरी पंडित आक्रमक झाले आहेत. काश्मीरमधील लोकांमध्ये संताप आहे. काश्मीरी पंडितांकडून टार्गेट किलिंगविरोधात निदर्शने करण्यात येत आहेत.

Target killing of two laborers in Jammu and Kashmir

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात